मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Shivpratap Garudjhep : शिवरायांचा आग्र्याहून सुटकेचा थरार आता टीव्ही अन् मोबाइलवर अनुभवता येणार

Shivpratap Garudjhep : शिवरायांचा आग्र्याहून सुटकेचा थरार आता टीव्ही अन् मोबाइलवर अनुभवता येणार

Harshada Bhirvandekar HT Marathi
Nov 04, 2022 12:00 PM IST

Shivpratap Garudjhep OTT Release : ‘शिवप्रताप गरुडझेप’ हा चित्रपट आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे.

Amol Kolhe
Amol Kolhe

Shivpratap Garudjhep : छत्रपती शिवाजी महराजांचा इतिहास म्हटला की, अंगावर शहारे येतातच. महाराजांचा हाच इतिहास सध्या वेगवेगळ्या चित्रपटांमधून नव्या पिढीच्या भेटीस येत आहे. अनेक चित्रपटांच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या या देदिप्यमान इतिहासाची सुवर्णपाने उलगडली जात आहेत. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘शिवप्रताप गरुडझेप’ या चित्रपटातून अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा आग्र्याहून सुटकेचा थरार मोठ्या पडद्यावर रेखाटला आहे. आता हाच थरार प्रेक्षकांना अगदी घरबसल्या अनुभवता येणार आहे.

ट्रेंडिंग न्यूज

‘शिवप्रताप गरुडझेप’ हा चित्रपट आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. चित्रपटगृहांत प्रदर्शित झालेल्या ‘शिवप्रताप गरुडझेप’ या चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभला. प्रेक्षकांचे प्रेम पाहून आता हा चित्रपट ओटीटीवर रिलीज करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आजपासून अर्थात ४ नोव्हेंबरपासून हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म ‘टीएफएस प्ले’वर पाहता येणार आहे. अभिनेते-निर्माते डॉ. अमोल कोल्हे यांनी सोशल मीडियावर ही आनंदाची बातमी शेअर केली आहे.

या चित्रपटाच्या ओटीटी रिलीजबद्दल बोलताना डॉ. अमोल कोल्हे म्हणाले की, ‘आमच्यासाठी ही अतिशय आनंदाची बाब आहे. मोठया पडद्यानंतर ओटीटीवर 'शिवप्रताप गरुडझेप' चित्रपटाचा प्रिमियर प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. प्रत्येक माध्यमाची स्वतःची ताकद आणि ओळख आहे. ओटीटीच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचा दैदिप्यमान इतिहास जगभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहचेल हे आमच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण आहे.’

लॉकडाऊन दरम्यान चित्रपटगृह बंद असल्याने प्रेक्षकांनी ओटीटी प्लॅटफॉर्मवर चित्रपट पाहण्याला पसंती दर्शवली. ओटीटी प्लॅटफॉर्ममुळे अगदी टीव्ही आणि मोबाईलवर, कुठेही आणि कधीही चित्रपटांचा आस्वाद घेता येऊ लागला. त्यामुळे अनेक बिग बजेट चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्यात आले. या नव्या माधमातून चित्रपटांना रसिक प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे.

'जगदंब क्रिएशन्स'ची निर्मिती असलेल्या ‘शिवप्रताप गरुडझेप’ चित्रपटाचे दिग्दर्शन कार्तिक राजाराम केंढे यांनी केले असून चित्रपटात डॉ. अमोल कोल्हे यांच्यासोबत यतीन कार्येकर, प्रतीक्षा लोणकर, हरक अमोल भारतीया, शैलेश दातार, हरीश दुधाडे, मनवा नाईक, पल्लवी वैद्य, अजय तपकिरे, रमेश रोकडे, अलका बडोला कौशल, आदी ईराणी, विश्वजीत फडते आदी कलाकारांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.

IPL_Entry_Point

विभाग