मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  The Kerala Story: जीवे मारण्याची धमकी, मध्यरात्री सोडावं लागलेलं हॉटेल! ‘द केरळ स्टोरी’च्या शूटिंगमध्ये आलेली अनेक विघ्न

The Kerala Story: जीवे मारण्याची धमकी, मध्यरात्री सोडावं लागलेलं हॉटेल! ‘द केरळ स्टोरी’च्या शूटिंगमध्ये आलेली अनेक विघ्न

Harshada Bhirvandekar HT Marathi
May 03, 2023 12:27 PM IST

The Kerala Story shooting: सुदीप्तो सेन यांनी या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान काय काय अडचणींना तोंड द्यावे लागले, याचे किस्से सांगितले आहे.

The Kerala Story
The Kerala Story

The Kerala Story shooting: बॉलिवूड अभिनेत्री अदा शर्मा अभिनित 'द केरळ स्टोरी' हा चित्रपट सध्या प्रचंड चर्चेत आहे. सुदीप्तो सेन दिग्दर्शित हा चित्रपट लव्ह जिहाद आणि धर्मांतर यासारख्या गंभीर विषयांवर भाष्य करणारा आहे. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीदरम्यान चित्रपटाचे दिग्दर्शक सुदीप्तो सेन यांनी म्हटले की, चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान त्यांना अनेक प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागला होता. यावेळी सुदीप्तो सेन म्हणाले की, आम्ही आता या गोष्टी बोलू इच्छित नाही, कारण इतरांना वाटेल की हे सगळं प्रसिद्धी मिळवण्यासाठी सुरू आहे.

ट्रेंडिंग न्यूज

सुदीप्तो सेन यांनी या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान काय काय अडचणींना तोंड द्यावे लागले, याचे किस्से सांगितले आहे. ते म्हणले, ‘या शूटिंग दरम्यान आमच्यावरही हल्ला झाला. आम्हाला आता ते सगळं सांगायचं नाही. कारण आता बोललो तर लोकांना वाटेल की, आम्ही प्रसिद्धीसाठी बोलत आहोत. एकदा तर अशी वेळ आली होती की, रात्री १२ वाजता हॉटेल सोडून जावे लागले होते. अक्षरशः ते राज्य सोडून साडेतीन किलोमीटर चालत दुसर्‍या राज्यात जावे लागले होते. यासाठी तेथील पोलिसांची मदत घ्यावी लागली. पण शेवटी महत्त्वाचे काय? तर, आम्ही एक खरा चित्रपट बनवला आहे. आता या चित्रपटासाठी गाणाऱ्या एका मुस्लिम गायिकेला धमक्या येत आहेत, त्यानंतर तिने पोलिसांची मदत घेतली आहे.’

Hema Malini- Dharmendra: धर्मेंद्र-हेमा मालिनी यांनी लग्नानंतर मिळून खरेदी केला होता आलिशान बंगला!

केरळमध्ये या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान टीमला अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता. चित्रपटात अशी अनेक दृश्ये होती, ज्यांना अनेक्कानी विरोध केला. ‘द केरळ स्टोरी’ हा चित्रपट पूर्णपणे सत्यकथेवर आधारित असल्याचा दावा या चित्रपटासाठी ७ वर्ष संशोधन करणाऱ्या संशोधनकर्त्यांनी केला आहे.

सुदीप्तो सेन यांच्या या चित्रपटात केरळमधील ३२००० बेपत्ता मुलींची कथा दाखवण्यात येणार आहे. या तरुणींना प्रथम इस्लाम स्वीकारण्यासाठी ब्रेनवॉश करण्यात आले होते आणि नंतर त्यांना ISIS दहशतवादी बनवले गेले. चित्रपटाच्या कथेनुसार, ही अशा एका मुलीची कथा आहे, जिला परिचारिका व्हायचे होते. पण, ती आयएसआयएसची दहशतवादी बनली. ‘द केरळ स्टोरी’ हा चित्रपट येत्या ५ मे रोजी रिलीज होणार आहे.

IPL_Entry_Point

विभाग