मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Baloch Movie: ‘बलोच’ चित्रपटातून अमोल कागणे झळकणार मोठ्या पडद्यावर; साकारणार ‘ही’ भूमिका!

Baloch Movie: ‘बलोच’ चित्रपटातून अमोल कागणे झळकणार मोठ्या पडद्यावर; साकारणार ‘ही’ भूमिका!

Harshada Bhirvandekar HT Marathi
Apr 26, 2023 02:29 PM IST

Amol Kagne in Baloch Movie: पानिपतच्या पराभवानंतर मराठ्यांना बलुचिस्तानात ज्या गुलामगिरीला समोर जावं लागलं, मराठ्यांनी लढलेल्या या अपरिचित लढ्याची शौर्यगाथा 'बलोच' चित्रपटामध्ये पाहायला मिळणार आहे.

Amol Kagne in Baloch Movie
Amol Kagne in Baloch Movie

Amol Kagne in Baloch Movie: मराठी मनोरंजन विश्वात सध्या ‘बलोच’ या चित्रपटाची जोरदार चर्चा रंगली आहे. ऐतिहासिक कथेवर आधारित हा चित्रपट येत्या ५ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटातून इतिहासाचं एक सुवर्ण पान उलगडलं जाणार आहे. या चित्रपटात अनेक प्रसिद्ध कलाकार झळकणार असून, यांच्यासोबतच अमोल कागणे देखील या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहे. सिनेविश्वातली काही कलाकार मंडळी ही स्वमेहनतीने आपलं स्थान सिनेसृष्टीत निर्माण करतात. कोणताही गॉड फादर नसताना आपल्या अंगी असलेल्या कलागुणांमुळे वा अंगी असलेल्या हिमतीमुळे ही कलाकार मंडळी सिनेमाविश्वात आपलं स्थान भक्कम करतात. अभिनेता, निर्माता अमोल कागणे हे अशाच कलाकारांपैकी एक नाव आहे.

ट्रेंडिंग न्यूज

फार कमी वयात यशाची पावलं चढणाऱ्या अमोल कागणेने आज सिनेमाविश्वात आपल्या नावाचा डंका गाजवलाय. असा हा हरहुन्नरी कलाकार नव्याने 'बलोच' या भव्य ऐतिहासिक चित्रपटातून रुपेरी पडद्यावर झळकण्यास पुन्हा एकदा सज्ज होत आहे. ‘बलोच’ या चित्रपटात अमोल कागणे सुभेदार सरफराज हे पात्र साकारणार आहे.

Nava Gadi Nava Rajya: ब्रेकनंतर ‘ही’ अभिनेत्री कामावर परतली! ‘नवा गडी नवं राज्य’मध्ये धमाकेदार एन्ट्री करणार

मराठ्यांची आणखी एक शौर्यगाथा मांडणारा हा 'बलोच' चित्रपट आहे. पानिपतच्या पराभवानंतर बलुचिस्तानातील गुलामगिरीत होरपळलेले मराठे, दरम्यान तेथील भयाण वास्तवाला ते कसे सामोरे गेले याचे चित्रण 'बलोच'मध्ये असणार आहे. मोहम्मद शाह अब्दाली यांच्या सैन्यदलातील एक सुभेदार ज्याचा या चित्रपटात प्रमुख वाटा आहे. सरफराज असे त्या सुभेदाराचे नाव आहे. या पात्राची लीलया चित्रपटात अमोल कागणे याने संभाळली आहे. प्रवीण तरडे यांच्या सोबत अमोलचा अभिनय मोठ्या पडद्यावर पाहणं रंजक ठरणार आहे.

वीर मराठ्यांच्या अनेक लढाया आजवर आपण मोठ्या पडद्यावर पाहिल्या आहेत. पानीपतची लढाईच ही चित्रपटांमधून आपण वर्णन पाहिलं आहे. मात्र या घटनेविषयी जाणून घेऊ तितकं कमीच म्हणायला हवं. पानिपतच्या पराभवानंतर मराठ्यांना बलुचिस्तानात ज्या गुलामगिरीला समोर जावं लागलं, मराठ्यांनी लढलेल्या या अपरिचित लढ्याची शौर्यगाथा 'बलोच' चित्रपटामध्ये पाहायला मिळणार आहे. येत्या ५ मे रोजी हा चित्रपट पुन्हा एकदा इतिहासातील आठवणींना उजाळा आहे.

IPL_Entry_Point

विभाग