मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Dada Kondke: दादा कोंडकेंचा ‘वाजवू का’ चित्रपट पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला! कधी आणि कुठे बघाल? वाचा...

Dada Kondke: दादा कोंडकेंचा ‘वाजवू का’ चित्रपट पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला! कधी आणि कुठे बघाल? वाचा...

Harshada Bhirvandekar HT Marathi
Oct 19, 2023 04:35 PM IST

Dada Kondke Movie: दादा कोंडके यांच्या अनेक सुपरहिट चित्रपटांपैकी एक म्हणजे ‘वाजवू का?’ हा चित्रपट प्रेक्षकांना पुन्हा पाहता येणार आहे.

 Vajau Ka
Vajau Ka

Dada Kondke Movies: अभिनेते दादा कोंडके यांच्या कोणत्याही चित्रपटाचं नाव घ्या, त्या प्रत्येक चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरशः वादळ आणले आहे. दादा कोंडके यांच्या गाजलेल्या चित्रपटांचा काळ अनुभवणं ही सिनेमाप्रेंमींसाठी कायमच एक पर्वणी असते. आता प्रेक्षकांना घरबसल्या पुन्हा एकदा दादा कोंडके यांच्या चित्रपटांची जादू अनुभवता येणार आहे. आता दादा कोंडके यांच्या अनेक सुपरहिट चित्रपटांपैकी एक म्हणजे ‘वाजवू का?’ हा चित्रपट प्रेक्षकांना पुन्हा पाहता येणार आहे. या चित्रपटातून अभिनेते रमेश भाटकर आणि अभिनेत्री नंदिनी जोग ही नवी कोरी जोडी प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. तर, दादा कोंडके यांनी अभिनयासोबतच दिग्दर्शनाची धुरा सांभाळत ‘वाजवू का?’ हा चित्रपट बनवला आणि सुपरहिट केला. या चित्रपटाची रंगत घरबसल्या पाहण्याची पर्वणी झी टॉकीजवर येत्या रविवारी २२ ऑक्टोबरला दुपारी १२ आणि सायंकाळी ६ वाजता मिळणार आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Nava Gadi Nava Rajya 19th Oct: रमामुळे येणार आनंदी आणि राघवच्या नात्यात दुरावा? मालिकेत रंजक वळण

दादा कोंडके म्हणजे मराठी सिनेसृष्टीला लाभलेले एक अनमोल रत्न होते. दादा कोंडके यांनी आपल्या चित्रपटांद्वारे मराठी सिनेसृष्टीत स्वतंत्र असे अढळ स्थान निर्माण केले. ग्रामीण मराठी प्रेक्षक आणि शाहीर दादा कोंडके यांचे वेगळे अतूट नाते जमले. दादा कोंडके म्हणजे बाप माणूस, उत्तम प्रतिभा आणि अचूकतेचा संगम होता, असे नेहमीच म्हटले जाते. मराठी प्रेक्षकांची नाडी ओळखलेला अवलिया म्हणजे दादा कोंडके. साचेबद्ध नायकासारखे ना व्यक्तिमत्व, ना सिनेमाक्षेत्रातील गॉडफादर, पण तरीही आपल्या हटके अंदाजाने दादा कोंडके यांनी सिनेसृष्टीत आपला दबदबा निर्माण केला. दादांच्या विनोदाची शैली, त्यांच्या चित्रपटांच्या कथा, गाणी, डान्स, संवाद यांनी प्रेक्षकांना मोहिनी घातली. दादा कोंडके यांचा चित्रपट थिएटरमध्ये लागला की, त्याकाळातील दिग्गज असलेले शो मॅन राज कपूर, बॉलिवूड स्टार देव आनंद यांनाही त्यांचे चित्रपट प्रदर्शित करण्याची तारीख बदलावी लागायची. दादा कोंडके यांच्या चित्रपटांची ही ताकद होती.

सध्या नवरात्रौत्सवाचे दिवस सुरू आहेत. तेजाचा उत्सव सुरू आहे. अशा काळात प्रेक्षकांचे मनोरंजन व्हावे म्हणून टीव्हीवर दादा कोंडके यांचे चित्रपट दाखवण्यास सुरुवात झाली आहे. ‘वाजवू का?’ हा चित्रपट म्हणजे सबकुछ दादा कोंडके आहे. कथा, पटकथा, संवाद, गाणी, अभिनय, दिग्दर्शन असे दादा कोंडके यांच्या कलाकारीचे खचाखच पॅकेज असलेल्या ‘वाजवू का?’ या चित्रपटात उषा चव्हाण आणि दादा कोंडके यांची अफलातून केमिस्ट्रीही पाहता येणार आहे. सत्तरच्या दशकांत दादा कोंडके हे नाव मराठी सिनेसृष्टीवर राज्य करण्यासाठी सज्ज झालं. त्यानंतर दादांचा चित्रपट म्हणजे भरपूर मनोरंजन हे एक समीकरणच झालं. १९९६ला पडदयावर आलेल्या ‘वाजवू का’ या चित्रपटानेही दादा कोंडके यांना बॉक्स ऑफिसवर प्रचंड यश मिळवून दिलं.

IPL_Entry_Point