मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Boyz 4: 'बॉईज ४'मध्ये कोणते कलाकार झलकणार? अखेर समोर आली माहिती

Boyz 4: 'बॉईज ४'मध्ये कोणते कलाकार झलकणार? अखेर समोर आली माहिती

Aarti Vilas Borade HT Marathi
Sep 20, 2023 03:52 PM IST

Boyz 4 Star Cast: ‘बॅाईज ४’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मात्र, या चित्रपटात कोणते कलाकार झळकणार? असा प्रश्न सर्वांना पडला होता. आता या कलाकारांबाबत माहिती समोर आली आहे.

Boyz 4
Boyz 4

बॅाईज, बॅाईज २, बॅाईज ३ बॅाक्स ॲाफिसवर धुमाकूळ घातल्यानंतर आता या बॅाईजची ही धमाल चौपट पटीने वाढणार आहे. कारण ‘बॅाईज ४’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटातील कलाकारांनी आपल्या सहकलाकारांचे पोस्टर सोशल मीडियावर शेअर करत असतानाच अखेर सर्वांचे असे एक पोस्टर नुकतेच झळकले आहे. त्यामुळे आता ‘बॅाईज ४’मध्ये या मोठ्या गॅंगची धमाल पाहायला मिळेल.

ट्रेंडिंग न्यूज

सुमंत शिंदे, पार्थ भालेराव आणि प्रतिक लाड यांच्यासोबत बॅाईजमध्ये झळकलेली ऋतिका श्रोत्री ‘बॅाईज ४’मध्येही दिसणार असून यात अभिनय बेर्डे, निखील बने, गौरव मोरे, रितुजा शिंदे, जुई बेंडखळे ही नवी गॅंगही सहभागी झाली आहे. या व्यतिरिक्त या चित्रपटात गिरीष कुलकर्णी, यतीन कार्येकर, समीर धर्माधिकारी आणि ओम पाटील यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. त्यामुळे जबरदस्त कलाकारांची ही फळी तुफान मस्ती करताना दिसणार आहे.
वाचा: 'जवान'मधील कलाकारासाठी किरण मानेची खास पोस्ट

‘बॅाईज’ हा मराठी सिमेसृष्टीतील पहिला चित्रपट आहे, ज्याचे चार भाग आले आहेत आणि यातील प्रत्येक भागात काहीतरी सरप्राईज होते. आता ‘बॅाईज ४’ मध्येही कलाकारांची जबरदस्त फळी दिसत आहे. आता यात कोणाच्या काय व्यक्तिरेखा आहेत आणि कोण काय काय धमाल करणार आहेत, हे मात्र २० ॲाक्टोबरला ‘बॅाईज’ आल्यावरच कळेल. सुप्रीम मोशन पिक्चर्स प्रा. लि. प्रोडक्शन अंतर्गत एव्हरेस्ट एंटरटेनमेंटसह अवधूत गुप्ते प्रस्तुत या चित्रपटाचे लालासाहेब शिंदे, राजेंद्र शिंदे, संजय छाब्रिया निर्माते आहेत तर विशाल सखाराम देवरूखकर दिग्दर्शित या चित्रपटाचे लेखन हृषिकेश कोळी यांनी केले आहे.

दिग्दर्शक विशाल देवरूखकर म्हणतात, ‘’ आतापर्यंत धैर्या, ढुंग्या आणि कबीरची मस्ती तुम्ही पाहिली आता ही मस्ती आणखी वाढणार आहे. ‘बॅाईज ४’ मल्टीस्टारर फिल्म आहे त्यामुळे यांची मस्तीही मल्टीपल होणार आहे. शाळा, ज्युनियर कॅालेज नंतरचा ‘बॅाईज’चा हा डिग्रीचा प्रवास सुरू होणार आहे.’’

WhatsApp channel

विभाग