मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Bigg Boss Marathi:'बिग बॉस मराठी'मधील स्पर्धकांचा येणार चित्रपट, 'या' दिवशी होणार प्रदर्शित

Bigg Boss Marathi:'बिग बॉस मराठी'मधील स्पर्धकांचा येणार चित्रपट, 'या' दिवशी होणार प्रदर्शित

Aarti Vilas Borade HT Marathi
Sep 03, 2023 08:52 AM IST

Dil Dosti Deewangi: या चित्रपटात अभिनेत्री स्मिता गोंदकर, वीणा जगताप, सुरेखा कुडची आणि विद्याधर जोशी महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

Bigg Boss Marathi
Bigg Boss Marathi

छोट्या पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय कार्यक्रमांपैकी एक म्हणजे 'बिग बॉस मराठी.' या कार्यक्रमाचे चार ही सीझन चांगलेच गाजले. कार्यक्रमात सहभागी झालेले स्पर्धकांमध्ये चांगली मैत्री पाहायला मिळते. बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यावरही त्यांच्यात मैत्रिचे नाते असते. मात्र, तुम्ही कधी बिग बॉसमध्ये दिसलेल्या स्पर्धकांना घरातून बाहेर पडल्यावर चित्रपटात एकत्र काम करताना पाहिले आहे का? नाही ना. मग आता तुमची ही इच्छा पूर्ण होणार आहे.

ट्रेंडिंग न्यूज

‘बिग बॉस’ गाजवलेली मंडळी आता ‘दिल दोस्ती दिवानगी’ करताना दिसणार आहेत. आपल्या दमदार अभिनयाने वेगवेगळ्या भूमिका लीलया साकारणारे अभिनेते विद्याधर जोशी, अभिनेत्री सुरेखा कुडची, ग्लॅमरस अभिनेत्री वीणा जगताप आणि स्मिता गोंदकर यांचा ‘दिल दोस्ती दिवानगी’ हा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

मैत्री, प्रेम त्यानंतरचं आयुष्य यांत अडकलेल्या प्रेमवीरांची कथा ‘दिल दोस्ती दिवानगी’ चित्रपटात मांडण्यात आली आहे. या प्रेमकथेच्या प्रवासात वळणावळणावर घडणाऱ्या अनपेक्षित गोष्टी, याचा रंजक अनुभव देणारा हा चित्रपट असून प्रेक्षक यात नक्कीच गुंतून जाईल. विद्याधर जोशी मायकेल ब्रिगेन्झा तर सुरेखा कुडची मिस मेरी या कॅथलिक व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहेत, तर स्मिता गोंदकर रिया आणि वीणा जगताप श्रियाच्या ग्लॅमरस अंदाजात दिसणार आहे. या चौघांसोबत कश्यप परुळेकर, चिराग पाटील, अतुल कवठळकर, तीर्था मुरबाडकर, तपन आचार्य, दुर्वा साळोखे, कंवलप्रीत सिंग, प्रदीप वेलणकर, विजय पाटकर, स्मिता जयकर हे कलाकार ही चित्रपटात दिसणार आहेत.

‘दिल दोस्ती दिवानगी’ हा मराठी चित्रपट ६ ऑक्टॉबेरला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. ट्रान्स इंडिया मिडिया अँड एन्टरटेनमेन्टची प्रस्तुती असलेल्या ‘दिल दोस्ती दिवानगी’ चित्रपटाची निर्मिती राजेंद्र राजन यांची असून शिरीष राणे चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत.

IPL_Entry_Point

विभाग