मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Nora Fatehi: डॉलर वाचवण्यासाठी बांगलादेश सरकारनं रद्द केला नोरा फतेहीचा डान्स

Nora Fatehi: डॉलर वाचवण्यासाठी बांगलादेश सरकारनं रद्द केला नोरा फतेहीचा डान्स

Aarti Vilas Borade HT Marathi
Oct 18, 2022 03:46 PM IST

Nora Fatehi Dance show: बांग्लादेशने डॉलर वाचवण्यासाठी नोराचा शो कॅन्सल केला आहे.

नोरा फतेही
नोरा फतेही (HT)

बॉलिवूडमधील प्रत्येक कलाकाराची एक वेगळी ओळख आहे. काहींनी अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मने जिंकली आहेत तर काहींनी डान्सने प्रेक्षकांना आकर्षित केले आहे. या यादीमधील एक अभिनेत्री म्हणजे नोरा फतेही. नोराला अनेक इवेंटला परफॉर्म करण्यासाठी बोलावले जाते. पण नुकताच बांग्लादेश सरकारने नोराचा डान्स शो कॅन्सल केला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

बांग्लादेशची राजधानी ढाका येथे नोराचा डान्स परफॉर्मन्स होणार होता. या कार्यक्रमसाठी नोराने मानधन हे डॉलर्समध्ये मागितले होते. पण अचानक तिचा शो कॅन्सल करण्यात आला आहे. बांग्लादेशच्या सांस्कृतिक मंत्रालयाने सोमवारी एक नोटिस जारी केली आहे. या नोटिशीमध्ये सांगण्यात आले आहे भारतीय फिल्म इंडस्ट्रीमधील अतिशय लोकप्रिय अभिनेत्री नोरा फतेहीचा डान्स परफॉर्मन्स रद्द करण्यात आला आहे.
वाचा: गौहर खान आणि साजिद खान होते रिलेशनशीपमध्ये, ‘या’ कारणामुळे केले नाही लग्न

जागतिक स्थिती पाहता आणि परकीय चलन साठा कायम ठेवण्याच्या उद्देशाने नोराचा डान्स परफॉर्मन्स करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. ढाका येथील एका कार्यक्रमात महिलांचा गौरव करण्यात येणार होता. या कार्यक्रमात नोरा डान्स परफॉर्म करणार होती आणि काही कर्तृत्वान महिलांना अवॉर्ड देण्यात येणार होता. पण या कार्यक्रमासाठी नोराने मानधन हे डॉलर्समध्ये मागितले होते. त्यामुळे तिचा शो रद्द करण्यात आलाय

कामाविषयी बोलायचे झाले तर नोरा लवकरच अजय देवगण आणि सिद्धार्थ मल्होत्राच्या 'थँक गॉड' चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात ती आयटम साँग करताना दिसणार आहे. तसेच नोरा सध्या एका डान्स रीयालिटि शोमध्ये परीक्षक म्हणून भूमिका बजावत आहे. तिच्या खास डान्स मुव्ह आणि तिच्या बोल्ड अंदाजासाठी ती सर्वात जास्त लोकप्रिय आहे.

IPL_Entry_Point

विभाग