मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Ayesha Takia Birthday: सुपरहिट चित्रपट देऊन बॉलिवूडमधून झाली गायब; आयेशा टाकियाबद्दल हे माहितीये?

Ayesha Takia Birthday: सुपरहिट चित्रपट देऊन बॉलिवूडमधून झाली गायब; आयेशा टाकियाबद्दल हे माहितीये?

Harshada Bhirvandekar HT Marathi
Apr 10, 2023 07:50 AM IST

Happy Birthday Ayesha Takia: सलमानच्या ‘वाँटेड’मधून बॉलिवूडमध्ये धुमाकूळ घालणारी आयेशा टाकिया या चित्रपटानंतर मनोरंजन विश्वातूनच गायब झाली.

Ayesha Takia
Ayesha Takia

Happy Birthday Ayesha Takia: बॉलिवूडचा ‘दबंग’ अर्थात सलमान खान याचा ‘वाँटेड’ हा चित्रपट आठवला की, पहिली गोष्ट डोळ्यांसमोर येते ती म्हणजे या चित्रपटाची अभिनेत्री आयेशा टाकिया. अभिनेत्री आयेशा टाकिया बॉलिवूडमध्ये आधीपासून सक्रिय असली तरी, सलमानच्या ‘वाँटेड’ने तिला खरी ओळख मिळवून दिली. मात्र, या चित्रपटानंतर अभिनेत्री मनोरंजन विश्वातूनच गायब झाली. या दरम्यानच्या काळात तिने एका बड्या राजकीय नेत्याच्या मुलासोबत लग्नगाठ बांधली. आज आयेशा टाकिया हिचा वाढदिवस आहे. याच निमित्ताने जाणून घेऊया तिच्याबद्दलच्या काही खास गोष्टी...

आयेशाने तिच्या करिअरमध्ये 'डोर', 'नो स्मोकिंग' आणि 'सोचा ना था' सारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. आयेशा लहान असल्यापासूनच तिला हिंदी चित्रपटांची नायिका व्हायचं होतं. वयाच्या अवघ्या ४थ्या वर्षी तिने पहिल्यांदा कॅमेऱ्यासमोर काम केलं. ‘कॉम्प्लेन’च्या जाहिरातीमध्ये आयेशा पहिल्यांदा झळकली होती. या जाहिरातीत आयेशासोबत शाहिद कपूरही दिसला होता. त्यानंतर तिला ‘कॉम्प्लेन गर्ल’ म्हणूनही ओळखलं जाऊ लागलं होतं. यानंतरही तिने व्हीआयपी सूटकेस, सिबाका टूथपेस्ट, गोदरेजसह ६०हून अधिक जाहिरातींमध्ये काम केले.

जाहिरातींमुळे आयेशाला तिच्या करिअरमधील पहिला मोठा ब्रेक मिळाला. प्रसिद्ध गायिका फाल्गुनी पाठकच्या 'मेरी चुनर उड उड जाये' या गाण्याच्या म्युझिक व्हिडीओमध्ये ती दिसली होती. यानंतर ती डीजे अकीलच्या 'शेक इट डॅडी' गाण्यात मॉडेल किथ सिक्वेरासोबत ती झळकली. यानंतर अब्बास-मस्तानच्या ‘टारझन- द वंडर कार’ या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले. तिचा हा चित्रपट फार गाजला नसला, तरी चांगला चालला होता. आयेशाच्या करिअरची सुरुवात चांगली झाली होती.

या दरम्यान अनेक बिग बजेट चित्रपट तिच्या हातून निसटले. याची सुरुवात शाहरुख खान स्टारर 'मैं हूं ना' या चित्रपटापासून झाली. या चित्रपटात आयेशा आधी अमृता रावने साकारलेली भूमिका करत होती. पण, नंतर काही कारणास्तव तिला या चित्रपटातून बाहेरचा रस्ता दाखवला गेला. 'मैं हूं ना' व्यतिरिक्त आयेशा आमिर खानसोबत 'गजनी'मध्येही काम करणार होती. तिने अनेक मुलाखतींमध्ये या चित्रपटाची सांगितले होते. मात्र, यातूनही ती बाहेर निघाली.

‘वाँटेड’ सुरू होण्याच्या पाच वर्षे आधीपासूनच आयेशा फरहान आझमी या हॉस्पिटॅलिटी बिझनेसमनसोबत रिलेशनशिपमध्ये होती. फरहान हा समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांचा मुलगा आहे. आयेशाने ‘वाँटेड’चे शूटिंग संपवले आणि वयाच्या २३ व्या वर्षी या चित्रपटाच्या रिलीज दरम्यानच फरहानशी लग्न केले. लग्नानंतर ती चित्रपटांपासून दूर झाली आणि पतीसोबत बिझनेस सांभाळत आहे.

IPL_Entry_Point

विभाग