गेल्या काही दिवसांपासून अल्लू अर्जुनचा पुष्पा २ या चित्रपटाची चर्चा रंगली आहे. नुकताच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आणि सोशल मीडियावर व्हायरल झाला. आता या चित्रपटासाठी अल्लू अर्जुनने किती मानधन घेतले आहे हे समोर आले आहे.
अल्लू अर्जुनने पुष्पा २ साठी सर्वाधिक मानधन घेतले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्लू अर्जुनने ८५ कोटी रुपये घेतले आहेत. तेलुगू फिल्म इंडस्ट्रीमध्ये अल्लू अर्जुन हा सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता ठरला आहे.
वाचा: 'पुष्पा २'चा टीझर पाहिलात का? अल्लू अर्जुनने जिंकली चाहत्याची मने
पुष्पा २ या चित्रपटाचा काही दिवसांपूर्वी एक टीझर शेअर करण्यात आला होता. या टीझरमध्ये अल्लू अर्जुन तुरुंगातून पळून गेल्याचे पाहायला मिळाले होते. पुष्पा जंगलात कुठे तरी जाऊन बसल्याचे टीझरमध्ये दाखवण्यात आले होते. आता समोर आलेल्या टीझरमध्ये पुष्पा जंगलात असल्याचे स्पष्ट झाले आहे. चित्रपटामधील अभिनेत्री रश्मिका मंदानाचा लूक रिव्हिल करण्यात आला होता. रश्मिकानं पुष्पा चित्रपटाच्या पहिल्या भागात श्रीवल्ली ही भूमिका साकारली होती.
सुकुमार लिखित आणि दिग्दर्शित, ‘पुष्पा’ हा दोन भागांचा अॅक्शन ड्रामा चित्रपट असून, यामध्ये अल्लू अर्जुन, फहाद फासिल आणि रश्मिका मंदाना मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट तमिळ, तेलुगू, मल्याळम, हिंदी या भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. हिंदी भाषेतील चित्रपटाला मराठमोळा अभिनेता श्रेयस तळपदेने आवाज दिला आहे.