मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Pushpa 2: 'पुष्पा २'चा टीझर पाहिलात का? अल्लू अर्जुनने जिंकली चाहत्याची मने

Pushpa 2: 'पुष्पा २'चा टीझर पाहिलात का? अल्लू अर्जुनने जिंकली चाहत्याची मने

Aarti Vilas Borade HT Marathi
Apr 08, 2023 12:35 PM IST

Allu Arjun: गेल्या काही दिवसांपासून अल्लू अर्जुनचा पुष्पा २ हा चित्रपट येणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. आता या चित्रपटाचा टीझर समोर आला आहे.

Allu Arjun
Allu Arjun

दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेता अल्लू अर्जुनचा पुष्पा द राइज हा चित्रपट गेल्या वर्षी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला होता. आता या चित्रपटाचा पुढचा भाग येणार असल्यामुळे सर्वजण उत्सुक आहेत. नुकताच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे.

'पुष्पा २'च्या सुरुवातीला पोलिसांनी पुष्पाला गोळ्या झाडल्याचे दिसत आहे. त्यानंतर पुष्पाचा मृत्यू झाला असे म्हटले जात आहे. मात्र, सर्वसामान्य जनतेला ते मान्य नाही. त्यांना त्यांचा पुष्पा हवा आहे. एक दिवस अचानक जंगलातील प्राण्यांसाठी लावण्यात आलेल्या कॅमेरामध्ये पुष्पाचा चेहरा दिसतो आणि सर्वजण आनंदी होतात. सध्या सोशल मीडियावर पुष्पा २चा टीझर चर्चेत आहे.
वाचा: लेकीचा हट्ट आई पूर्ण करणार; अखेर अरुंधती ईशा आणि अनिशचं लग्न लावणार!

टीझर पाहून पुष्पा परत त्याच्या माणसांमध्ये येणार का? तो पोलिसांना फसवून कसं येणार? असे अनेक प्रश्न प्रेक्षकांना पडले आहेत. या सर्व आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे प्रेक्षकांना चित्रपट पाहिल्यावर मिळणार आहेत.

पुष्पा २ या चित्रपटाचा काही दिवसांपूर्वी एक टीझर शेअर करण्यात आला होता. या टीझरमध्ये अल्लू अर्जुन तुरुंगातून पळून गेल्याचे पाहायला मिळाले होते. पुष्पा जंगलात कुठे तरी जाऊन बसल्याचे टीझरमध्ये दाखवण्यात आले होते. आता समोर आलेल्या टीझरमध्ये पुष्पा जंगलात असल्याचे स्पष्ट झाले आहे. चित्रपटामधील अभिनेत्री रश्मिका मंदानाचा लूक रिव्हिल करण्यात आला होता. रश्मिकानं पुष्पा चित्रपटाच्या पहिल्या भागात श्रीवल्ली ही भूमिका साकारली होती.

सुकुमार लिखित आणि दिग्दर्शित, ‘पुष्पा’ हा दोन भागांचा अॅक्शन ड्रामा चित्रपट असून, यामध्ये अल्लू अर्जुन, फहाद फासिल आणि रश्मिका मंदाना मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट तमिळ, तेलुगू, मल्याळम, हिंदी या भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. हिंदी भाषेतील चित्रपटाला मराठमोळा अभिनेता श्रेयस तळपदेने आवाज दिला आहे.

IPL_Entry_Point

विभाग