मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Aai Kuthe Kay Karte: लेकीचा हट्ट आई पूर्ण करणार; अखेर अरुंधती ईशा आणि अनिशचं लग्न लावणार!

Aai Kuthe Kay Karte: लेकीचा हट्ट आई पूर्ण करणार; अखेर अरुंधती ईशा आणि अनिशचं लग्न लावणार!

Harshada Bhirvandekar HT Marathi
Apr 07, 2023 10:32 AM IST

Aai Kuthe Kay Karte Latest Update: नेहमीच आपल्या मुलांसाठी योग्य निर्णय घेणारी आणि त्यांच्या भविष्याचा विचार करणारी ‘आई’ म्हणजेच अरुंधती आता पुन्हा एकदा आपल्या लेकीसाठी ठाम निर्णय घेणार आहे.

Aai Kuthe Kay Karte
Aai Kuthe Kay Karte

Aai Kuthe Kay Karte Latest Update: आई कुठे काय करते’ या मालिकेत आता पुन्हा एकदा अरुंधतीचं नवं रूप पाहायला मिळणार आहे. नेहमीच आपल्या मुलांसाठी योग्य निर्णय घेणारी आणि त्यांच्या भविष्याचा विचार करणारी ‘आई’ म्हणजेच अरुंधती आता पुन्हा एकदा आपल्या लेकीसाठी ठाम निर्णय घेणार आहे. ईशा आणि अनिश या दोघांनीही भविष्याच्या दिशेने चुकीचं पाऊल उचलण्य आधीच आता अरुंधतीने त्यांच्यासाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. मात्र, नेहमीप्रमाणेच तिच्या या निर्णयाला देखील सगळ्यांचाच विरोध होणार आहे.

ट्रेंडिंग न्यूज

ईशा आणि अनिशच्या नात्याला अनिरुद्धचा विरोध आहे. मात्र, ईशाने यावेळी हट्टच केला आहे. तिने अनिशशी लग्न करण्याचा निर्णय घेतला असून, त्यासाठी ती काहीही करण्यास तयार आहे. ‘माझं अनिशवर प्रेम आणि मी त्याच्याशीच लग्न करणार’ असं ईशा अनिरुद्धला ठणकावून सांगितले आहे. हे ऐकून अनिरुद्ध आणखी संतापला आहे. जर, अनिशसोबत भविष्याचा विचार करत असशील तर, आताच सोडून दे, अन्यथा परिणाम वेगळे दिसतील, असा धमकीवजा इशारा अनिरुद्ध ईशाला दिला होता. यानंतर आता ईशाने घरातून पळून जाण्याचा निर्णय घेतला होता.

ईशा घरातून पळून गेलीये हे लक्षात येताच घरातील सगळीच मंडळी चिंतेत पडली होती. सगळ्यांची खूप शोधाशोध सुरू झाली आणि त्यांनी ईशाला शोधून देखील काढलं. केवळ अनिशसोबत लग्न करण्यासाठी ईशाने हे पाऊल उचललं आहे, हे लक्षात येताच आता अरुंधतीने लेकीचा विचार करून मोठा निर्णय घेण्याचा विचार केला आहे. आता अरुंधती ईशा आणि अनिशचं लग्न लावून देण्याचा निर्णय घेणार आहे. तर, तूर्तास त्यांचा साखरपुडा करून देऊया, असा निर्णय तिने सगळ्यांना सांगितला आहे.

आता अरुंधतीचा हा निर्णय घरातील सगळ्या लोकांना तापणार का? ते या निर्णयाला पाठींबा देणार का? याकडे सगळ्यांचेच लक्ष लागून राहिले आहे. एकीकडे यशचा साखरपुडा झाल्यानंतर त्याचं लग्न मोडलं. त्यामुळे आता ईशाच्या बाबतीत असा प्रकार घडू नये यासाठी सगळेच नकार देण्याची शक्यता आहे. मात्र, यावेळी अरुंधती आपल्या लेकीच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणार आहे.

IPL_Entry_Point