मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Avatar 2: प्रतीक्षा संपली! ‘अवतार २’ आता घरबसल्या पाहता येणार! कधी व कुठे? जाणून घ्या...

Avatar 2: प्रतीक्षा संपली! ‘अवतार २’ आता घरबसल्या पाहता येणार! कधी व कुठे? जाणून घ्या...

Harshada Bhirvandekar HT Marathi
Jun 07, 2023 11:41 AM IST

Avatar 2 OTT Release: जेम्स कॅमेरून यांचा 'अवतार: द वे ऑफ वॉटर' हा चित्रपट आता ओटीटीवर रिलीज झाला आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला होता.

Avatar 2
Avatar 2

Avatar 2 OTT Release: जेम्स कॅमेरून यांचा 'अवतार: द वे ऑफ वॉटर' हा चित्रपट आता ओटीटीवर रिलीज झाला आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला होता. आता प्रेक्षकांना हा चित्रपट घरबसल्या देखील पाहता येणार आहे. 'अवतार: द वे ऑफ वॉटर' हा चित्रपट १६ डिसेंबर २०२२ रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाला. दिग्दर्शक जेम्स कॅमेरून दिग्दर्शित या सायन्स फिक्शन चित्रपटाने अनेक रेकॉर्ड मोडीत काढले आहेत. या चित्रपटाने व्हिज्युअल इफेक्ट्स श्रेणीमध्ये २०२३चा ऑस्कर पुरस्कार देखील जिंकला आहे. चला तर जाणून घेऊया, केव्हा आणि कुठे हा चित्रपट पाहता येऊ शकणार आहे...

ट्रेंडिंग न्यूज

'अवतार: द वे ऑफ वॉटर' हा चित्रपट डिस्नेप्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर आज म्हणजेच ७ जूनपासून रिलीज करण्यात आला आहे. आता तुम्ही कधी आणि कुठेही बसून हा चित्रपट पाहण्याचा आनंद लुटू शकता. या चित्रपटाचे मेकिंग बजेट अतिशय मोठे आहे. तब्बल २५० मिलिअन डॉलर्स, अर्थात २००० कोटी रुपये खर्च करून हा चित्रपट तयार करण्यात आला आहे. ‘अवतार: द वे ऑफ वॉटर’ हा चित्रपट बॉक्स तुफान गाजला होता.

‘अवतार: द वे ऑफ वॉटर’ हा चित्रपट केवळ इंग्रजी नाही तर, हिंदी, तमिळ, तेलुगु, कन्नड आणि मल्याळम या भाषांमध्येही प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ‘अवतार: द वे ऑफ वॉटर’मध्ये पेंडोरा आपल्या जमीनीचं आणि आपल्या ग्रहाचं संरक्षण करण्यासाठी लढताना दिसले आहेत. या चित्रपटाचे आणखी ५ भाग २०२८पर्यंत रिलीज होणार आहेत. याचा पहिला भाग २००९मध्ये रिलीज झाला होता. आता तब्बल १३ वर्षांनी या चित्रपटाचा सिक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाच्या पहिल्या भागाने तब्बल २० हजार कोटींची कमाई कलेक्शनचे रेकॉर्ड मोडले होते.

IPL_Entry_Point

विभाग