मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Ask SRK : ‘पठाण’ पाहिल्यावर गौरी काय म्हणाली? चाहत्याच्या प्रश्नाला उत्तर देताना शाहरुख खान म्हणाला...

Ask SRK : ‘पठाण’ पाहिल्यावर गौरी काय म्हणाली? चाहत्याच्या प्रश्नाला उत्तर देताना शाहरुख खान म्हणाला...

Harshada Bhirvandekar HT Marathi
Feb 04, 2023 01:06 PM IST

Ask SRK session by Shah Rukh Khan: ‘पठाण’च्या घवघवीत यशानंतर आज शाहरुख खान याने आपल्या चाहत्यांशी संवाद साधला. यावेळी चाहत्यांनी त्याला अनेक प्रश्न विचारले.

Shah Rukh Khan-Gauri
Shah Rukh Khan-Gauri

Ask SRK session by Shah Rukh Khan: बॉलिवूड किंग शाहरुख खानचा ‘पठाण’ हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाने रिलीज होताच कोट्यवधींचा गल्ला जमवला आहे. केवळ देशातच नव्हे, तर परदेशांतही या चित्रपटाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. या सगळ्यांत आता शाहरुख खानने पुन्हा एकदा चाहत्यांशी थेट संवाद साधला आहे. शाहरुख खान सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमीच आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असतो. इतकंच नाही तर, चाहत्यांनी विचारलेल्या प्रश्नांना देखील तो उत्तरं देतो.

ट्रेंडिंग न्यूज

‘Ask SRK’ या ट्विटर सेशनमध्ये चाहते आणि सोशल मीडिया युझर अभिनेता शाहरुख खान याला टॅग करून आपल्या मनातील कोणताही प्रश्न विचारू शकतात. यातील प्रश्नांना शाहरुख खान स्वतः उत्तरं देतो. आजच्या या सेशनमध्ये देखील चाहत्यांनी शाहरुखवर अनेक भन्नाट प्रश्नांची सरबत्ती केली. विशेष म्हणजे शाहरुखनेही वेळात वेळ काढून चाहत्यांच्या या प्रश्नांची उत्तरं दिली आहेत.

‘पठाण’च्या घवघवीत यशानंतर आज शाहरुख खान याने आपल्या चाहत्यांशी संवाद साधला. यावेळी चाहत्यांनी त्याला अनेक प्रश्न विचारले. तर, शाहरुख खानने देखील त्याच्या चाहत्यांच्या प्रश्नांना हटके उत्तरे दिली आहेत. यावेळी एका चाहत्याने शाहरुख खानला विचारले की, ‘पठाण हा चित्रपट पाहिल्यानंतर पत्नी गौरीची प्रतिक्रिया काय होती?’ यावर उत्तर देताना शाहरुख खान म्हणाला की, ‘तिला खूप आनंद झाला होता. माझं संपूर्ण कुटुंब माझ्यासाठी खूप खूश आहे.’ अतिशय साध्या आणि सोप्या शब्दांत शाहरुख खानने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. शाहरुखच्या या उत्तराने देखील चाहत्यांची मने जिंकून घेतली आहे. शाहरुख खान हा बॉलिवूडचा ‘फॅमिली मॅन’ आहे, असे चाहते म्हणत आहेत.

बॉलिवूडचा रोमान्स किंग अर्थात अभिनेता शाहरुख खान हा आपल्या अभिनयानेच नाही तर, आपल्या काही कृतींमुळे देखील चाहत्यांच्या मनावर राज्य करतो. नेहमी चाहत्यांशी संपर्कात राहणाच्या सवयीमुळे शाहरुख आणि त्याच्या फॅन्समध्ये एक घट्ट नातं निर्माण झालं आहे. अभिनेता शाहरुख खान आपल्या चाहत्यांशी किती कनेक्टेड आहे, याचं उदाहरण त्याच्या सोशल मीडिया सेशनमधून पाहायला मिळालं. अभिनेत्याने त्याच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर नुकतंच एक‘आस्क एसारके’ सेशन ठेवलं होतं. या दरम्यान त्याने चाहत्यांच्या सगळ्या प्रश्नांना उत्तरं दिली.

IPL_Entry_Point