मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Radhika Merchant Video: आलिया भट्टच्या गाण्यावर अंबानींच्या होणाऱ्या सुनेने धरला ठेका; व्हिडीओ व्हायरल

Radhika Merchant Video: आलिया भट्टच्या गाण्यावर अंबानींच्या होणाऱ्या सुनेने धरला ठेका; व्हिडीओ व्हायरल

Harshada Bhirvandekar HT Marathi
Jan 18, 2023 09:52 AM IST

Anant Ambani and Radhika Merchant mehendi function: मेहंदी सोहळ्यात अंबानींच्या होणाऱ्या सुनेने आलिया भट्टच्या गाण्यावर ठेका धरला होता.

Anant Ambani and Radhika Merchant mehendi function
Anant Ambani and Radhika Merchant mehendi function

Anant Ambani and Radhika Merchant mehendi function: रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांच्या घरी पुन्हा एकदा जल्लोषाचे वातावरण आहे. मुकेश आणि नीता यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी लवकरच बोहल्यावर चढणार आहे. गेल्या वर्षी २९ डिसेंबरला अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा साखरपुडा पार पडला होता. राजस्थानमधील नाथद्वारा येथील श्रीनाथजी मंदिरात हा सोहळा पार पडला होता. आता लवकरच ते लग्न बंधनात अडकणार आहेत. सध्या राधिकाच्या मेहंदी सोहळ्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

या मेहंदी सोहळ्यात अंबानींच्या होणाऱ्या सुनेने आलिया भट्टच्या गाण्यावर ठेका धरला होता. ‘कलंक’ चित्रपटातील ‘घर मोरे परदेसीया’ या आलिया भट्टच्या गाण्यावर राधिका मर्चंट हिने डान्स केला आहे. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. राधिका एक चांगली डान्सर आहे. तिने ८ वर्ष भरतनाट्यमचे शिक्षण घेतले आहे. राधिकाचा डान्स पाहून आजूबाजूला बसलेले सर्वजण टाळ्या वाजवत आहेत.

या व्हिडीओमध्ये राधिका एका सुंदर गुलाबी लेहेंग्यात खूप सुंदर दिसत आहे. मेहंदी लुकसाठी राधिकाने चोकर नेकलेस, मॅचिंग कानातले, मांग-टिका आणि एक लांब हार परिधान केला होता. या फोटोत राधिका अनंतच्या नावाची मेंदी हातावर लावताना दिसत आहे. यादरम्यान, चेहऱ्यावर मोठं हसू पाहून राधिकाचा आनंद ओसंडून वाहताना दिसत आहे. या सोहळ्यातील फोटोंमध्ये राधिका तिची मेहंदी फ्लाँट करताना कॅमेरासमोर पोज देत होती.

राधिका मर्चंट ही वीरेन मर्चंट आणि शैला मर्चंट यांची मुलगी आहे. वीरेन हे एनकोर हेल्थकेअरचे सीईओ आहेत. तर, राधिका ही एक भारतीय शास्त्रीय नृत्यांगना आहे. राधिका लवकरच अंबानी कुटुंबाची धाकटी सून होणार आहे. अनंत आणि राधिका एकमेकांना खूप दिवसांपासून ओळखतात. अंबानी कुटुंबातील प्रत्येक फॅमिली फंक्शनमध्ये राधिका देखील दिसली आहे.

IPL_Entry_Point

विभाग