मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Amruta Khanvilkar: अमृता खानविलकर दिसणार हॉरर कॉमेडी चित्रपटात, लूक चर्चेत

Amruta Khanvilkar: अमृता खानविलकर दिसणार हॉरर कॉमेडी चित्रपटात, लूक चर्चेत

Aarti Vilas Borade HT Marathi
Feb 27, 2023 08:42 AM IST

Amruta Khanvilkar: अमृता खानविलकरच्या या आगामी चित्रपटाचे पोस्टर नुकताच प्रदर्शित करण्यात आले आहे. या पोस्टरने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

अमृता खानविलकर
अमृता खानविलकर (HT)

गेल्या काही दिवसांत बॉक्सऑफिसवर मराठी चित्रपटांचाही बोलबाला दिसून आला. वेगवेगळ्या जॉनरचे मराठी चित्रपट आपल्या भेटीस आलेले आपण पाहिले. प्रेक्षकांनी या सगळ्या चित्रपटांना चांगला प्रतिसादही दिला. आता मराठीतील अनेक उत्कृष्ट कलाकारांची टीम घेऊन रोमॅंटिक सिनेमांचे बादशहा संजय जाधव पहिल्यांदाच घेऊन येतायत हॉरर कॉमेडी चित्रपट. या चित्रपटात अभिनेत्री अमृता खानविलकर महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.

ट्रेंडिंग न्यूज

आतापर्यंत संजय जाधव यांनी 'दुनियादारी', 'प्यारवाली लव्हस्टोरी', 'तू ही रे', 'लकी','चेकमेट', 'खारी बिस्किट', 'ये रे ये रे पैसा','तमाशा लाइव्ह' अशा वेगवेगळ्या जॉनरच्या चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन केले. पण आता पहिल्यांदाच संजय जाधव 'कलावती' या चित्रपटाच्या माध्यमातून हॉरर कॉमेडी जॉनर घेऊन भेटीस येत आहेत त्यामुळे निश्चितच उत्सुकता आहे. अमृता खानविलकर, संजय नार्वेकर, तेजस्विनी लोणारी, अभिजित चव्हाण, हरीश दुधाडे, ओंकार भोजने, दिप्ती धोत्रे,संजय शेजवळ,नील साळेकर(इन्फ्लूएन्सर) अशी कलाकारांची तगडी टीम 'कलावती' या चित्रपटात दिसणार आहे.
वाचा: नवाजवर पत्नीने केला बलात्काराचा आरोप, व्हिडीओ व्हायरल

मुंबईत आजीवासन स्टुडिओत या चित्रपटाचा मुहूर्त सोहळा २६ फेब्रुवारी,२०२३ रोजी संपन्न झाला. मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध गायक, संगीतकार,निर्माते आणि दिग्दर्शक अवधूत गूप्ते प्रमुख पाहुणे म्हणून या मुहूर्त सोहळ्यास उपस्थित होते. तसंच, चित्रपटातील कलाकारांसोबत इतर टीमनं देखील मुहूर्त सोहळ्यास उपस्थिती दर्शवली होती. चित्रपटाच्या मुहूर्त सोहळ्या दिवशीच प्रसिद्ध गायक आदर्श शिंदे यांच्या आवाजात चित्रपटातील पहिलं गाणं देखील रेकॉर्ड करण्यात आलं.

'कलावती' चित्रपटाच्या निर्मितीची जबाबदारी प्रजय कामत यांनी उचलली आहे. दिग्दर्शनाची जबाबदारी उचलण्यासोबतच संजय जाधव हे 'कलावती' चित्रपटाचे 'डीओपी' म्हणूनही काम पाहणार आहेत. चित्रपटाचे संगीतकार पंकज पडघन हे असणार आहेत. मराठीतील प्रसिद्ध लेखक अभिजित गुरुनं चित्रपटाची पटकथा लिहिली आहे, तर चित्रपटाची कथा निशांत भुसे आणि अनुजा कर्णिक यांची आहे.

IPL_Entry_Point

विभाग