मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Amruta Fadnavis: ‘तेरे नाल ही नचणा वे’वर अमृता फडणवीस यांचा रिल स्टारसोबत भन्नाट डान्स, Video Viral

Amruta Fadnavis: ‘तेरे नाल ही नचणा वे’वर अमृता फडणवीस यांचा रिल स्टारसोबत भन्नाट डान्स, Video Viral

Aarti Vilas Borade HT Marathi
Jan 19, 2023 09:00 AM IST

Amruta Fadnavis Video: अमृता फडणवीस यांनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला असून सध्या चर्चेत आहे.

अमृता फडणवीस
अमृता फडणवीस (HT)

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी आणि गायिका अमृता फडणवीस या सतत चर्चेत असतात. त्या सोशल मीडियाच्या माध्यमातून सामाजिक विषयांवर मत मांडताना दिसतात. काही दिवसांपूर्वी अमृता फडणवीस यांचे 'आज मूड बना लिया' हे गाणे प्रदर्शित झाले. त्यांच्या या गाण्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. आता अमृता यांचा रिल स्टार रियाझसोबतचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये त्या डान्स करताना दिसत आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

अमृता फडणवीस यांनी त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर रियाढ अलीसोबतचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ते दोघे आज मूड बना लिया या गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. सोशल मीडियावर अमृता फडणवीस यांचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्यासोबत असल्याचे दिसत आहे.
वाचा: देवेंद्रजी बायकोला मराठी बोलायला शिकवा; अमृता फडणवीस ट्रोलर्सच्या निशाण्यावर

अमृता फडणवीस यांचे हे नवे गाणे ‘टी सीरिज’ बॅनर खाली बनवण्यात आले आहे. या गाण्यातील त्यांचा लूकने सर्वांचे लक्ष वेधले आहे. या लूकमध्ये त्यांनी जीन्स, टॉप व जॅकेट परिधान केले आहे. या लूकवर त्यांनी हटके फॅशन ज्वेलरी परिधान केली आहे. त्यांच्या हा स्टायलिश लूक पाहून सर्वांचे लक्ष वेधले. आता, त्यांचा लूक पाहून नेटकरी देखील प्रतिक्रिया देत आहेत.

IPL_Entry_Point

विभाग