मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Amruta Fadnavis: रियाज सोबतच्या 'त्या' व्हिडीओमुळे अमृता फडणवीस अडचणीत, काय आहे प्रकरण?

Amruta Fadnavis: रियाज सोबतच्या 'त्या' व्हिडीओमुळे अमृता फडणवीस अडचणीत, काय आहे प्रकरण?

Aarti Vilas Borade HT Marathi
Jan 19, 2023 03:47 PM IST

Amruta Fadnavis Reel: राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या हेमा पिंगळे यांनी अमृता फडणवीस यांच्या व्हिडीओवर आक्षेप घेतला आहे

अमृता फडणवीस
अमृता फडणवीस (HT)

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी आणि गायिका अमृता फडणवीस या सध्या चर्चेत आहेत. या चर्चा त्यांनी रिल स्टार रियाझसोबत शूट केलेल्या एका व्हिडीओमुळे रंगल्या आहेत. या व्हिडीओमुळे अमृता या अडचणीत सापडल्या आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

अमृता फडणवीस यांनी त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर रियाझ अलीसोबतचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ते दोघे ‘आज मूड बना लिया’ या गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. खरंतर व्हिडीओ रियाझसोबत शूट केल्यामुळे अडचणी निर्माण झाल्या नसून व्हिडीओ सरकारी बंगल्यात शूट केल्यामुळे निर्माण झाल्या आहेत.

अमृता यांनी हा व्हिडीओ सरकारी बंगल्यात शूट केल्यामुळे राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या हेमा पिंगळे यांनी आक्षेप घेतला आहे. 'गानकोकिळा आणि नृत्यांगना असलेल्या अमृता फडणवीस यांना संविधानिक पदावरील व्यक्तींना देण्यात येणारी व्हाय दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. त्यावर सरकार खर्च करत आहे. परंतु, त्यांनी बनवलेलं हे रील सरकारी बंगल्यातील आहे. त्यांनी त्यांच्या अधिकारांचा गैरवापर केला आहे. त्यांनी हा व्हिडिओ चित्रित करण्यापूर्वी सरकारची अधिकृत परवानगी घेतली होती का? त्यांनी परवानगी घेतली असेल तर ते देखील व्हायरल करा' असे प्रश्न हेमा पिंगळे यांनी उपस्थित केले आहेत.

काही दिवसांपूर्वीच अमृता फडणवीस यांचे 'आज मूड बना लिया' हे नवे गाणे प्रदर्शित झाले. हे गाणे ‘टी सीरिज’ बॅनर खाली बनवण्यात आले आहे. या गाण्यातील त्यांचा लूकने सर्वांचे लक्ष वेधले. या गाण्यातील लूकमध्ये त्यांनी जीन्स, टॉप व जॅकेट परिधान केली आहे. या लूकवर त्यांनी हटके फॅशन ज्वेलरी परिधान केली. त्यांच्या या स्टायलिश लूकने सर्वांचे लक्ष वेधले. आता, रियाझ अलीसोबत याच गाण्यावर व्हिडीओ करणे अमृता यांना महागात पडले आहे.

IPL_Entry_Point

विभाग