मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  ठरलं! गंगुबाई काठियावाडी 'या' ओटीटी प्लॅटफॉर्मवर होणार प्रदर्शित

ठरलं! गंगुबाई काठियावाडी 'या' ओटीटी प्लॅटफॉर्मवर होणार प्रदर्शित

Aarti Vilas Borade HT Marathi
Apr 20, 2022 12:21 PM IST

जाणून घ्या कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर आणि कधी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

आलिया भट्ट
आलिया भट्ट (HT)

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टचा गंगुबाई काठियावाडी हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला. या चित्रपटातील आलियाच्या भूमिकेने अनेकांची मने जिंकली. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जवळपास १०० कोटी रुपयांची कमाई केली होती. आता संजय लीला भंसाली यांचा 'गंगुबाई काठियावाडी' हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. चित्रपट घर बसल्या पाहाता येणार असल्यामुळे चाहत्यांना आनंद झाला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

'गंगुबाई काठियावाडी' हा चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. नेटफ्लिक्स इंडियाने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर गंगुबाई काठियावाडी चित्रपटासंबंधी पोस्ट शेअर केली आहे. 'गंगुबाई काठियावाडी हा चित्रपट २६ एप्रिल रोजी नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे' या आशयचे कॅप्शन देते चित्रपटाचा नवा टीझर शेअर केला आहे. आता हा चित्रपट ओटीटीवर पाहायला मिळणार असल्यामुळे सर्वांना आनंद झाला आहे.

‘गंगूबाई काठियावडी’ हा चित्रपट मुंबईतील कमाठीपुराच्या माफिया क्वीन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गंगूबाई यांच्या जीवनावर आधारित आहे. अगदी कमी वयात स्वतःच्या नवऱ्यानेच कमाठीपुरा येथील एका कोठ्यावर विकल्यानंतर अनेक संघर्ष करत गंगूबाई तिथल्या माफिया क्वीन कशा झाल्या, याची कथा या चित्रपटाच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर पाहायला मिळाली. आलिया भट्टची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले. सोशल मीडियावरही या चित्रपटाची बरीच चर्चा झाली होती. एवढच नाही तर समीक्षकांनीही आलिया भट्टच्या अभिनयाचे कौतुक केले होते. आलिया भट्टच्या अभिनयातूनच चित्रपटासाठी तिने घेतलेली मेहनत दिसून आली. आता हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होत असल्यामुळे सर्वांना आनंद झाला आहे.

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या