मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Hera Pheri 3: चाहत्यांसह कलाकारांचाही आग्रह; अक्षय कुमार ‘हेरा फेरी ३’मध्ये परतणार?

Hera Pheri 3: चाहत्यांसह कलाकारांचाही आग्रह; अक्षय कुमार ‘हेरा फेरी ३’मध्ये परतणार?

Harshada Bhirvandekar HT Marathi
Dec 05, 2022 05:27 PM IST

Hera Pheri 3: चाहत्यांच्या आणि सहकलाकारांच्या मागणीचा मान ठेवत अक्षय कुमार ‘हेर फेरी ३’ या चित्रपटात परतणार असल्याचे म्हटले जात आहे.

Hera Pheri 3
Hera Pheri 3

Hera Pheri 3: बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय चित्रपटांमध्ये ‘हेरा फेरी’ या चित्रपटाचं नाव अग्रक्रमी येतं. रिलीजच्या अनेक वर्षांनंतरही या चित्रपटाची चर्चा पाहायला मिळतेय. आता या चित्रपटाचा सिक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘हेरा फेरी ३’ची घोषणा झाल्यापासून चाहते या चित्रपटाच्या अपडेट जाणून घेण्यासाठी उत्सुक झाले आहेत. या सगळ्या चर्चांदरम्यान अभिनेता अक्षय कुमार याने चित्रपटातून काढता पाय घेतल्याचे म्हटले जात होते. यानंतर कलाकारांसह चाहत्यांनी देखील अक्षय कुमारने या चित्रपटात काम करावे, असा आग्रह धरला होता.

ट्रेंडिंग न्यूज

आता चाहत्यांच्या आणि सहकलाकारांच्या मागणीचा मान ठेवत अक्षय कुमार या चित्रपटात परतणार असल्याचे मीडिया रिपोर्टमध्ये म्हटले जात आहे. अक्षय कुमारशिवाय ‘हेरा फेरी ३’ बनूच शकत नाही, असे सगळ्यांचेच मत आहे. यामुळे आता मेकर्सनी पुन्हा एकदा अक्षयची मनधरणी करण्यास सुरुवात केली आहे. गेल्या काही दिवसांपासून फिरोज नाडियादवाला अक्षय कुमारशी चर्चा करत असल्याचे काही मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटले गेले आहे.

चित्रपटाचे निर्माते फिरोज नाडियादवाला यांच्यासोबतचे वाद आणि या चित्रपटाची कथा आवडली नसल्याचे कारण देत अक्षय कुमारने स्वतः आपण या चित्रपटातून बाहेर पडत असल्याचे म्हटले होते. दरम्यान, अक्षय कुमार-साजिद नाडियादवाला यांच्यातील मैत्री आणि साजिद-फिरोज नाडियादवाला या भावांमधील वैर अक्षय कुमारच्या एक्झिटसाठी कारणीभूत असल्याचे म्हटले गेले. मात्र, आता फिरोज नाडियादवाला चाहत्यांची मागणी लक्षात घेऊन पुन्हा एकदा अक्षय कुमारची मनधरणी करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्या या प्रयत्नांना यश आले तर, ‘हेरा फेरी ३’मध्ये पुन्हा एकदा अक्षय कुमार दिसू शकतो.

‘हेर फेरी ३’मध्ये अक्षय कुमार दिसणार नसल्याचे कळताच चाहत्यांमध्ये निराशेचं वातावरण निर्माण झालं होतं. यानंतर ‘नो अक्षय कुमार, नो हेरा फेरी’ हा हॅशटॅग सोशल मीडियावर ट्रेंड होताना दिसत आहे. अक्षय कुमारने हा चित्रपट नाकारल्यास निर्मात्यांचं देखील मोठं नुकसान होऊ शकतं, अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे मेकर्स देखील अक्षय कुमारकडे विनवण्या करताना दिसत आहेत.

IPL_Entry_Point

विभाग