मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Akshay Kumar: अक्षय कुमार अखेर कॅनडाचं नागरिकत्व सोडणार? काय म्हणाला वाचा...

Akshay Kumar: अक्षय कुमार अखेर कॅनडाचं नागरिकत्व सोडणार? काय म्हणाला वाचा...

Harshada Bhirvandekar HT Marathi
Feb 24, 2023 12:27 PM IST

Akshay Kumar Canada Citizenship: अक्षय कुमारला कॅनडाच्या नागरिकत्वाच्या मुद्द्यावरून अनेकदा टीकेला सामोरे जावे लागते. मात्र, आता अभिनेत्याने कॅनडाचे नागरिकत्व सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

Akshay Kumar
Akshay Kumar

Akshay Kumar Canada Citizenship: बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारला कॅनडाच्या नागरिकत्वाच्या मुद्द्यावरून अनेकदा टीकेला सामोरे जावे लागते. मात्र, आता अभिनेत्याने कॅनडाचे नागरिकत्व सोडण्याचा निर्णय घेतला आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अक्षय कुमार म्हणाला की, त्याच्यासाठी भारत म्हणजे सर्वकाही आहे. इतकेच नाही तर, त्याने आधीच भारतीय पासपोर्टसाठी अर्ज केला आहे. अक्षय कुमारचे हे बोल ऐकून आता चाहते देखील खूश झाले आहेत.

एका प्रसिद्ध वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अक्षय म्हणाला की, जेव्हा लोक त्याच्या कॅनेडियन नागरिकत्व स्वीकारण्यामागचे कारण न जाणून घेता, त्याला नावं ठेवतात तेव्हा त्याला वाईट वाटते. अक्षय म्हणाला, ‘भारत माझ्यासाठी सर्वस्व आहे… मी जे काही कमावले आहे, जे काही मिळवले आहे ते मला येथून मिळाले आहे. आणि मी भाग्यवान आहे की मला परत देण्याचीही संधी मिळाली आहे. जेव्हा लोक काहीही नकळत काहीही बोलतात, तेव्हा खूप वाईट वाटते.’

अक्षय कुमार म्हणाला की, एक काळ असा होता जेव्हा त्याने १५पेक्षा जास्त फ्लॉप चित्रपट दिले होते. अर्थात ही घटना १९९०च्या दशकांतील आहे. अक्षय म्हणाला की, चित्रपट बॉक्स ऑफिसवर सतत खराब कामगिरी करत असल्यामुळे त्याला कॅनेडियन नागरिकत्व स्वीकारावे लागले होते. कारण सांगताना तो म्हणाला की, ‘त्यावेळी मला वाटले आता माझे चित्रपट चालत नसतील तर मला काम करावे लागेल. मी तिथे कामासाठी गेलो होतो. तेव्हा माझा मित्र कॅनडामध्ये होता आणि तो म्हणाला म्हणून मी कॅनडाचे नागरिकत्व स्वीकारले.’

‘त्यावेळी माझे फक्त दोन चित्रपट रिलीज व्हायचे बाकी होते आणि सुदैवाने ते दोन्ही सुपरहिट ठरले. त्यावेळी माझा मित्र म्हणाला, परत जा आणि पुन्हा कामाला लाग. इथे आलो आणि मला आणखी काही चित्रपट मिळाले. पुढे अजून काम मिळत राहिले. यासगळ्यात मी याबद्दल विसरूनच गेलो होतो. पासपोर्ट बदलून घ्यावा असे मला कधीच वाटले नव्हते. पण आता हो, मी माझा पासपोर्ट बदलण्यासाठी अर्ज केला आहे.’

IPL_Entry_Point

विभाग