मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Swara Bhasker: बॉलिवूडमध्ये दहशतीचं वातावरण; स्वरा भास्कर हिनं साधला अक्षय कुमारवर निशाणा

Swara Bhasker: बॉलिवूडमध्ये दहशतीचं वातावरण; स्वरा भास्कर हिनं साधला अक्षय कुमारवर निशाणा

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Feb 22, 2023 05:51 PM IST

Swara Bhasker: बॉलिवूडच्या सिनेमांवरील बहिष्काराच्या ट्रेंडबद्दल बोलताना अभिनेत्री स्वरा भास्कर हिनं खळबळजनक वक्तव्य केलं आहे.

Swara Bhaskar
Swara Bhaskar

Swara Bhasker: बॉलिवूडमधील घटना-घडामोडींवर व राजकीय स्थितीवर बेधडक भाष्य करणारी अभिनेत्री स्वरा भास्कर हिनं पुन्हा एकदा विविध मुद्द्यांवर रोखठोक मतं मांडली आहेत. ‘बॉलिवूडमध्ये सध्या दहशतीचं वातावरण असून त्या विरोधात सर्वांनी एकजूट होण्याची गरज आहे,’ असं तिनं म्हटलं आहे. सुशांतसिंह प्रकरणी करण जोहर यांची पाठराखण करतानाच स्वरानं अक्षय कुमारवर निशाणा साधला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

'जहाँ चार यार' या सिनेमाच्या निमित्तानं 'कनेक्ट एफएम इंडिया'ला दिलेल्या मुलाखतीत स्वरा भास्कर बोलत होती. बॉलिवूडमधील काही चित्रपटांवर बहिष्कार टाकण्याचा ट्रेंड सध्या सुरू आहे. त्याबद्दल तिनं खंत व्यक्त केली. या द्वेषपूर्ण बहिष्कारामुळंच लालसिंह चड्ढा आणि रक्षाबंधन सारखे सिनेमे फ्लॉप झाले. आमीर खान याच्या सिनेमाला लक्ष्य करण्यासाठी त्याचं एक जुनं वक्तव्य उकरून काढलं गेलं. पैसे देऊन ही बहिष्काराची मोहीम उघडली जाते. मलाही तशी ऑफर आली होती. डिजिटल मार्केटिंगसाठी माणसं नेमण्यास सांगण्यात आलं होतं, असा खुलासाही तिनं केला.

Raju Srivastava: प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांंचं निधन; एम्स रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

'हा काळ कठीण आहे. बॉलिवूडमध्ये सध्या एक भीतीचं वातावरण आहे. हा एक उद्योग आहे. कुठल्याही वादात पडायचं नाही असा साधारण या उद्योगातील लोकांचा कल असतो. काही वाद उद्भवलाच तर त्यापासून दूर राहणंच चांगलं असं इथले लोक मानतात. मात्र, आता सिनेमातील लोकांनी एकत्र यायला हवं. तर, बॉलिवूडवर होणारे हल्ले थांबतील, असं मत तिनं व्यक्त केलं.

करण जोहरची पाठराखण

सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर करण जोहरसह बॉलिवूडमधील काही सेलिब्रिटिंना टार्गेट केलं गेलं. कारण नसताना करणचं नावं सुशांतसिंहच्या मृत्यूशी जोडण्याचा प्रयत्न केला गेला. ‘हे आरोप होत असतानाही करण जोहर काही बोलला नाही,’ याकडं तिनं लक्ष वेधलं. ‘करण जोहरबद्दल तुमची मतं काहीही असू शकतात. तो बेक्कार चित्रपट बनवतो. घराणेशाहीला प्रोत्साहन देतो. तो तुम्हाला आवडतही नसेल, पण म्हणून त्याला खुनी ठरवणं चुकीचं आहे,’ असं स्वरा भास्कर म्हणाली. 'बॉलिवूडमध्ये नेहमीच वेगवेगळे विचारप्रवाह राहिले आहेत. अक्षय कुमार ज्या पद्धतीचे चित्रपट करतो, ते मला पटत नाहीत. पण याचा अर्थ त्याचे पिक्चर चालूच नये. ते प्रदर्शितच होऊ दिले जाऊ नये, असं मी कधीच म्हणणार नाही, असंही तिनं स्पष्ट केलं.

IPL_Entry_Point

विभाग