मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Megha Ghadge: माझे घुंगरू आणि शालू विकायला काढलाय, घ्याल का?; ‘लावणी क्वीन’ने ट्रोलर्सना सुनावले

Megha Ghadge: माझे घुंगरू आणि शालू विकायला काढलाय, घ्याल का?; ‘लावणी क्वीन’ने ट्रोलर्सना सुनावले

Harshada Bhirvandekar HT Marathi
Nov 05, 2022 02:24 PM IST

Megha Ghadge: लावणीच्या नावाखाली सुरू असलेल्या अश्लील नृत्य प्रकारावर मेघाने सडकून टीका करणारी एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली होती.

Megha Ghadge
Megha Ghadge

Megha Ghadge Post Viral: अभिनेत्री आणि नृत्यांगना मेघा घाडगे हिने सध्या सोशल मीडियावर गाजत असलेल्या गौतमी पाटील हिच्या लावणीवर टीका करणारी एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. या पोस्टमध्ये मेघा घाडगेने गौतमीला चांगलेच सुनावले आहे. लावणीच्या नावाखाली सुरू असलेल्या अश्लील नृत्य प्रकारावर मेघाने सडकून टीका करणारी एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली होती. या पोस्टवर कमेंट करत काही सोशल मीडिया युझर्सनी मेघालाच ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, मेघाने देखील या ट्रोल करणाऱ्या व्यक्तीला चांगलेच खडसावले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

‘खूप खूप धन्यवाद गौतमी पाटील. आज तुला लावणी क्वीन हा किताब मिळाला. माफ कर खूप चूक झाली. खरंतर अशी लावणी असते हे आमच्या पूर्वजांना ही माहित न्हवतं. का आम्हाला असं चुकीचं शिकवलं गेलं? का या शाहिरानीं कवन लिहिली? पुस्तकातून चुकीचा लोककलेचा अभ्यास शिकवला. कृपा करून बंद करा हे सगळं. विनाकारण लोककलवांत पिढ्यान पिढ्या कलेच्या नावाखाली पुरस्कार घेत गेले, आत्ता माझे डोळे उघडले. मीही या पुढे साडीचा पदर अंगावर घेणार नाही. पायाखालून कमरेपर्यंत येईल तेवढी साडी, परकर वर करेन आणि पाण्याची बाटली घेऊन अंगावर ओली चिंब होईपर्यंत ओतेन. पायात घुंगरू घालू की नको..? लक्षात नाही तू घातले होतेस का? काल तर प्रेक्षकांमधून गर्दीत एकाचा खून झाला. खूप वाईट वाटलं ऐकून. पण, तुझी ती भन्नाट अश्लील अदाकरी बघायला कोणाला नाही आवडणार. अभी तो ‘पिक्चर’ बाकी हैं...!! आम्ही आपले बसलोय अदाकारीची शिबीर करत, प्लीज मला हे सगळं शिकवं, अल्बममध्ये केलंय थोडंसं (कटा कीरर्रर्र) ते ही आयटम साँग म्हणून.. पण स्टेजवर नाही केलं कधी. मला तुझी शिष्य बनवशिल का?’ अशी पोस्ट मेघाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केली होती.

मेघाला ट्रोल करण्याचा प्रयत्न

यावर गौतमीच्या एका चाहत्याने कमेंट करत मेघाला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. ‘गौतमी पाटील ही गौतमी पाटील आहे, समाजाने तिला स्वीकारलं आहे. तिच्यामुळे तुमच्या सुपाऱ्या बंद झाल्या हे तुझं दुखणं आहे... बाकी नाही! ‘बिग बॉस’मध्ये चेक मिळवण्यासाठी गेलेल्या ज्येष्ठ कलावंत घाडगे ताई! इथे लिहून रोडवर येऊन गौतमीला मिळणाऱ्या सुपाऱ्या बंद नाही होऊ शकत... सत्य आणि वास्तव आहे’, अशी कमेंट एका युझरने केली. यावर मेघाने देखील सणसणीत उत्तर दिलं आहे.

मेघाचं सणसणीत उत्तर

मेघाने देखील यावर उत्तर देत लिहिले की, ‘समाज आम्हाला नाही स्वीकारणार, कारण आम्ही शिवकालीन संस्कृती जपली आणि पारंपरिक लोककला पुढल्या पिढीला देण्याचा प्रयत्न केला. खूप मूर्ख आहेत लोक. बिग बॉस एक शो आहे, तिथेही मीं पैसे मिळतील म्हणून गेले. सॉरी मीं अगदीच कपडे पूर्ण घातले आणि बाप काढला आणि शिवीगाळ केली म्हणून भांडले, तर तसं नाही करायला हवं होत. उपाशी राहून कुटुंबासाठी नाही जायला हवं होत. पण खऱ्या अर्थाने तिने आमचे डोळे उघडले. आमच्या सुपाऱ्या बंद केल्या, पारंपरिक लावणी पाहायला येणारा प्रेक्षक पळून लावला काही दिवसांतच... थोडे फार का होईनात आधी येत होते. आता त्यांना गौतमी सारखी लावणी आणि खरी अश्लील अदाकारा मिळाली. आत्ता नक्कीच चांगले दिवस येतील. दादा माझे घुंगरू आणि शालू विकायला काढलेत प्लीज घ्याल का?? आणि गौतमीला गुरु मानलंय तुमच्या डोळ्या देखत शिष्य म्हणून स्वीकार करेल का मला? भाऊ म्हणून येवढ करा माझ्यासाठी..! म्हणजे अश्या बिगबॉस सारख्या कार्यक्रमात चेक घ्यायला जाणार नाही मीं.’ मेघाचं हे सडेतोड उत्तर ऐकून ट्रोल करणाऱ्यांची बोलती मात्र बंद झाली आहे.

 

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या