मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  TMKOC: 'वाटतं तुला पकडून ओठांना kiss करावं', शोच्या निर्मात्यावर अभिनेत्रीने केले लैंगिक शोषणाचे आरोप

TMKOC: 'वाटतं तुला पकडून ओठांना kiss करावं', शोच्या निर्मात्यावर अभिनेत्रीने केले लैंगिक शोषणाचे आरोप

Shrikant Ashok Londhe HT Marathi
May 11, 2023 08:44 PM IST

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : अभिनेत्रीजेनिफर मिस्त्रीहिने निर्माता असित मोदी यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. मागील १५ वर्षापासूनअसित मोदी तिच्याशी सेटवर गैरवर्तन करत आहे. त्यामुळे १५ वर्षानंतर ती हो शो सोडत आहे.

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah

गेल्या अनेक वर्षापासून 'तारक मेहता का उल्टा चश्मा' प्रसिद्धीच्या झोतात आहे. मात्र सध्या एका वेगळ्याच कारणामुळे शो चर्चेत आला आहे.  मालिकेच्या निर्मात्यांवर लैंगिक शोषणाचे आरोप करण्यात आले आहेत. तसे पाहिले तर हा शो टीआरपीमध्ये नंबर वन स्थानावर आहे. मात्र या   शो मधील कलाकार सतत निर्मात्यांवर गंभीर आरोप लावत आहेत. याआधी तारक मेहताची भूमिका करणारा अभिनेता शैलेश लोढा याने शो चे प्रोड्यूसर असित मोदी यांच्यावर पैसे न दिल्याचा आरोप केला होता. आता अभिनेत्री जेनिफर मिस्त्री हिने निर्माता असित मोदी यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. जेनिफरने माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, मागील १५ वर्षापासून असित मोदी तिच्याशी सेटवर गैरवर्तन करत आहे. त्यामुळे १५ वर्षानंतर ती हो शो सोडत आहे. 

ट्रेंडिंग न्यूज

माझ्या होठांची प्रसंशा करत होते मोदी - जेनिफर
रोशन सिंग सोढीची भूमिका करणाऱ्या जेनिफर मिस्त्री हिने माध्यमांशी बोलताना सांगितले की,  'असित मोदी मला वारंवार कॉल करून खोलीत बोलवत होते. मी नकार दिल्यानंतर म्हणायचे की, मी तर गंमत करत होतो. मात्र ते नेहमी असे करू लागले. सर्वांसमोर माझ्या होठांचे कौतुक करत मला वैयक्तिक मेसेज करायचे. या प्रकाराकडे मी सुरुवातील दुर्लक्ष केले. मात्र एकदा माझ्या लग्नाच्या वाढदिवसाच्या दुसऱ्या दिवशी त्यांनी कॉल केला व म्हटले की, लग्नाचा वाढदिवस तर संपला आता तर खोलीत ये. दुसऱ्या दिवशी त्यांनी म्हटले की, तू खूप सुंदर दिसतेस. तुझे ओठ खूप सुंदर आहेत. वाटतं तुला पकडून किस करावं. मला त्यांच्या बोलण्याचे वाईट वाटत होते व मी रात्रभर रडत होते. 

प्रोफेशनलीही दिला त्रास - 
जेनिफरने सांगितले की, एकादा वैयक्तिक कारणांसाठी मी असितला कॉल केला होता. त्यांनी माझी अडचण ऐकल्यानंतर म्हटले की, जर तू माझ्या जवळ असतीस तर तुला मिठ्ठी मारली असती. त्यांनी ज्या पद्धीतने हे वाक्य बोलले ते खूपच घाणेरडे होते. अशा प्रकारच्या घटना अनेक वेळा झाल्या मात्र मी इकडे लक्ष दिले नाही त्यानंतर त्यांनी माझे फोन उचलने बंद केले. माझ्या सुट्ट्या रद्द करू लागले. माझे मानधन सर्वात कमी होते. मात्र शॉट असू दे किंवा नाही, सर्वाधिक काळ ते मलाच सेटवर थांबवून ठेवत होते. केवळ असित मोदी यांनीच नाही तर त्यांच्या टीममधील सुहेल आणि जतिन यांनीही मला त्रास दिला. 

निर्मात्यांविरुद्ध तक्रार - 
जेनिफरने असित मोदी, सुहेल रमानी आणि जतिन बजाज यांच्याविरुद्ध लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला आहे. तिने म्हटले आहे की, आतापर्यंत मी असित मोदी यांची मुलगी व त्यांच्या कुटूंबाकडे पाहून गप्प होते. मात्र आता माझे पती व सासरचे लोक माझ्यासोबत आहेत. मा स्वत:साठी नाही तर माझ्यासारख्या अन्य कलाकारांसाठीही लढत आहेत. 

अजित मोदीची प्रतिक्रिया - 
असित मोदी यांनी याप्रकरणी म्हटले की, सेटवर जेनिफरची वागणूक चांगली नव्हती. याबाबत आम्ही अनेक वेळा प्रॉडक्शन हेड कडे तक्रार केली आहे. ज्या दिवशी तिचा सेटवर शेवटचा दिवस होता, त्यादिवशी ती संपूर्ण युनिटच्या समोर शिवीगाळ करत होती. इतकेच नाही तर आपले शुटींग न संपवताच ती सेटवरून निघून गेली.

IPL_Entry_Point

विभाग