मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Sushant Singh Rajput: सुशांत सिंहचा खून झाला; आमिर खानच्या भावाचा खळबळजनक दावा

Sushant Singh Rajput: सुशांत सिंहचा खून झाला; आमिर खानच्या भावाचा खळबळजनक दावा

Aarti Vilas Borade HT Marathi
Sep 17, 2022 10:51 AM IST

आमिर खानचा भाऊ फैजल खानने एका मुलाखतीमध्ये दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूविषयी खुलासा केला आहे.

फैजल खान
फैजल खान (HT)

बॉलिवूड अभिनेता आमिर खानचा भाऊ फैजल खान सध्या चर्चेत आहे. फैजलला ‘मेला’ या चित्रपटातून प्रसिद्धी मिळाली होती. त्याने दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या निधनाबाबत मोठे वक्तव्य केले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

फैजलने नुकतीच 'टाइम्स नाऊ'ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याने अनेक मुद्द्यांवर वक्तव्य केले. बॉक्य ऑफिस, कौटुंबिक वाद, बॉलिवूड, बिग बॉस अशा अनेक मुद्द्यांवर बिनधास्त वक्तव्य केले आहे. तसेच त्याने दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या निधनाबाबत वक्तव्य केले. त्यावर त्याने दिलेल्या उत्तराने सर्वांचे लक्ष वेधले आहे.
वाचा: खुशखबर! फ्रेंड आणि परी पुन्हा भेटणार पण एका नव्या वेळेत

फैजलला सुशांतच्या निधनाविषयी प्रश्न विचारण्यात आला होता. तेव्हा तो म्हणाला, 'सुशांत सिंह राजपूतची हत्या करण्यात आली. त्याची केस पुन्हा सुरु होईल की नाही हे आपल्याला वेळच सांगेल. त्याच्या निधनाचा तपास सुरु आहे. अनेकदा सत्य समोर येत नाही. मी देवाकडे प्रार्थना करतो की सुशांतच्या निधनामागचे सत्य सगळ्यांसमोर येऊ दे.' त्याचे हे वक्तव्य सध्या चर्चेत आहे.

फैजलने आमिर खानवर अनेक अरोप केले होते. त्यानंतर तो बॉलिवूडपासून दूर गेला होता. त्याने ‘चिनार’, ‘दास्तान’ या चित्रपटांमध्ये काम केले होते. त्याच्या या भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीला उतरल्या होत्या.

IPL_Entry_Point

विभाग