मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Aamir Khan Birthday: ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ आमिर खानबद्दल ‘या’ भन्नाट गोष्टी माहितीयेत का?

Aamir Khan Birthday: ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ आमिर खानबद्दल ‘या’ भन्नाट गोष्टी माहितीयेत का?

Harshada Bhirvandekar HT Marathi
Mar 14, 2023 07:36 AM IST

Happy Birthday Aamir Khan: बॉलिवूडचा ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ म्हणजेच अभिनेता आमिर खान आज आपला ५८वा वाढदिवस साजरा करत आहे.

Aamir Khan
Aamir Khan

Happy Birthday Aamir Khan: बॉलिवूडचा ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ म्हणजेच अभिनेता आमिर खान आज (१४ मार्च) आपला ५८वा वाढदिवस साजरा करत आहे. वयाच्या अवघ्या ८व्या वर्षी बालकलाकार म्हणून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या आमिर खान याने अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. ‘गजनी’, ‘लगान’, ‘मंगल पांडे’, ‘थ्री इडियट्स’सारखे दमदार चित्रपट देणाऱ्या आमिर खानने प्रत्येक चित्रपटासाठी खास मेहनत घेतली आहे. आमिर खानबद्दल अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या कदाचित तुम्ही आजवर कधी ऐकल्या देखील नसतील...

अभिनेता आमिर खान हा स्वातंत्र्य सैनिकाच्या कुटुंबातील आहे. आमिर खानबद्दल ही गोष्ट फार कमी लोकांना माहिती आहे. खिलाफत चळवळीत महत्त्वाची भूमिका बजावणारे मौलाना अबुल कलाम आझाद हे स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षणमंत्री होते. आमिर खान मौलाना आझाद यांचा पणतू आहे.

अभिनेता होण्यापूर्वी आमिर खान एक उत्कृष्ट टेनिसपटू होता. त्याने अनेक राज्यस्तरीय चॅम्पियनशिप स्पर्धांमध्ये भाग घेतला होता आणि या स्पर्धा जिंकला देखील होता. आमिर खान राष्ट्रीय स्तरावरही टेनिस खेळला आहे. खेळा’सोबतच तो प्रचंड हुशार देखील आहे. आमिर खान ‘रुबिक्स क्यूब’ सोडवण्यात पारंगत आहे. भर प्रेक्षकांच्या गर्दीत अवघ्या ३६ सेकंदात रुबिक्स क्यूब सोडवून त्याने सर्वांनाच आश्चर्यचकित केले होते.

आमिर खान याला बॉलिवूडचा ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ म्हटले जाते. मात्र, प्रत्यक्ष आयुष्यात त्याला अंघोळ करण्याचा प्रचंड कंटाळा येतो. याचा खुलासा त्याची पूर्व पत्नी किरण राव हिने स्वतः केला होता. अगदी काहिअतरी आवश्यकता असते आणी गरज पडते तेव्हाच आमिर अंघोळ करतो, असे तिने म्हटले होते. यावेळी तिने एक किस्सा देखील शेअर केला होता. १९९८मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘गुलाम’ या चित्रपटात आमिर खानने दमदार भूमिका साकारली होती. या चित्रपटातील एका फायटिंग सीनसाठी आमिर खानने तब्बल १२ दिवस अंघोळ केली नव्हती. चित्रपटातील हा सीन खूप मोठा होता आणि आमिरला पुन्हा पुन्हा मेकअप करण्यात वेळ वाया घालवायचा नव्हता. त्यामुळे सीन पूर्ण होईपर्यंत त्याने आंघोळच केली नव्हती आणि मेकअपही तसाच ठेवला होता. हा सीन शूट करण्यासाठी १२ दिवस लागले होते.

IPL_Entry_Point

विभाग