नुकताच ऑस्कर २०२३ हा पुरस्कार सोहळा पार पडला. यंदाचा ९५वा ऑस्कर सोहळा लॉस एंजेलिस येथे आयोजित करण्यात आला होता. चित्रपटसृष्टीमध्ये सर्वात मानाचा सजमल्या जाणाऱ्या या पुरस्कार सोहळ्याला अनेक कलाकारांनी हजेरी लावली. यंदाच्या पुरस्कार सोहळ्यात RRR या चित्रपटातील नाटू नाटू गाण्याला नॉमिनेशन मिळाले होते. त्यानंतर या गाण्याला ऑस्कर मिळाल्याचे समोर आले. दरम्यान, आरआरआर चित्रपटाचे दिग्दर्शक राजमौली यांचा ऑस्कर सोहळ्यातील व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
जेव्हा ऑस्कर सोहळ्यामध्ये नाटू नाटू या गाण्याला पुरस्कार घोषीत करण्यात आल तेव्हा राजमौली यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. नाटू नाटू गाण्याला ऑस्कर घोषीत करताच राजामौली यांनी पत्नीला कडकडून मिठी मारली त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
वाचा: ऑस्कर सोहळ्यातील व्हिडीओ शेअर करत आनंद महिंद्रांनी केलं दीपिकाचं कौतुक
एसएस राजामौली यांनी ‘आरआरआर’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. तर, ‘नाटू नाटू’ हे गाणे एमएम कीरावानी यांनी संगीतबद्ध केले आहे. हे गाणे गायक काला भैरव आणि राहुल यांनी गायले आहे. त्यांच्या या गाण्याने आता ऑस्कर जिंकत सर्वांच्या माना अभिमानाने उंचावल्या आहेत.
यंदाचा ९५वा ऑस्कर सोहळा हा लॉस एंजेलिस येथे आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात भारताला दोन ऑस्कर मिळाले आहेत. बेस्ट डॉक्युमेंट्री शार्ट फिल्म या ऑस्कर पुरस्काराच्या श्रेणीत भारताच्या 'द एलिफंट व्हिस्पर्स'ने बाजी मारली आहे. त्यापाठोपाठ 'आरआरआर' या चित्रपटातील 'नाटू नाटू' गाण्याला बेस्ट ओरिजनल साँग या श्रेणीत ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे. ही भारतीयासाठी अभिमानास्पद बाब आहे.