मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Bhagyashree Mote : अभिनेत्री भाग्यश्री मोटेच्या बहिणीचा संशयास्पद मृत्यू, चेहऱ्यावर जखमांचे निशाण

Bhagyashree Mote : अभिनेत्री भाग्यश्री मोटेच्या बहिणीचा संशयास्पद मृत्यू, चेहऱ्यावर जखमांचे निशाण

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Mar 13, 2023 11:51 PM IST

Bhagyashree Mote sister madhu dead : अभिनेत्री भाग्यश्री मोटे हिच्या बहिणीचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. भाग्यश्री मोटेच्या बहिणीचे नावमधू मार्कंडे असे होते.

भाग्यश्री मोटेच्या बहिणीचा संशयास्पद मृत्यू
भाग्यश्री मोटेच्या बहिणीचा संशयास्पद मृत्यू

मराठी चित्रपट विश्वातून एक दु:खद बातमी येत आहे. प्रसिद्ध अभिनेत्री भाग्यश्री मोटे हिच्या बहिणीचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. भाग्यश्री मोटेच्या बहिणीचे नावमधू मार्कंडे असे होते. मधुचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत मिळाला. तिच्या चेहऱ्यावर जखमांचे निशाण होते. यावरून मधूची हत्या झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

मधूचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळला. तिच्या चेहऱ्यावर जखमांचे अनेक निशाणही आहेत. मधूच्या चेहऱ्यावर या जखमा कशा झाल्या? याचा तपास पोलीस करत आहेत.

मधू मैत्रिणीसोबत पुण्यातील वाकडमध्ये बेकरी व्यवसाय करत होती. रविवारी मधू तिच्या मैत्रिणी सोबत भाड्याने खोली बघायला गेली होती. खोली बघितल्यानंतर मधूला चक्कर आली आणि तिची दातखीळ बसली, यानंतर मैत्रिणीने मधूला खासगी रुग्णालयात दाखल केले. तेथे मधूवर उपचार होऊ शकले नाहीत. यानंतर तिला महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण मेमोरियल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं, तेथे तिला मृत घोषित करण्यात आलं.

 

मधूच्या कुटुंबालाही तिच्या हत्येचा संशय आहे. वाकड पोलिसांनी याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

बहिणीच्या मृत्यूनंतर भाग्यश्री मोटेने तिच्यासोबतचे काही फोटो शेअर केले आहेत. पहिल्या फोटोमध्ये भाग्यश्री बहिणीली किस करत आहे. हा फोटो शेअर करत तिने म्हटलं की, “तू नाही आहेस?”. बहिणीच्या आठवणींमध्ये तिने आणखी दोन पोस्ट शेअर केल्या आहेत.

 

बहिणीच्या खांद्यावर हात ठेवत भाग्यश्रीने आणखी एक फोटो शेअर केला. “तुला मी कशी जाऊ देऊ? तू माझ्या असण्याचा भाग आहेस. शांत झोप आता. बाकी तुझी बाळ सांभाळून घेतील”. असं भाग्यश्रीने म्हटलं आहे. भाग्यश्रीची ही पोस्ट पाहून तिचे चाहतेही हळहळले आहेत.

IPL_Entry_Point

विभाग