मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Aamir Khan: सतत फ्लॉप चित्रपट देऊन आमिर खान थकला? नेपाळच्या विपश्यना केंद्रात पोहोचल्याने चर्चांना उधाण

Aamir Khan: सतत फ्लॉप चित्रपट देऊन आमिर खान थकला? नेपाळच्या विपश्यना केंद्रात पोहोचल्याने चर्चांना उधाण

Harshada Bhirvandekar HT Marathi
May 08, 2023 11:42 AM IST

Aamir Khan At Vipassana Centre Nepal : आपल्या दमदार अभिनयच्या जोरावर बॉलिवूडमध्ये अनेक सुपरहिट चित्रपट देणारा आमिर खान सध्या ब्रेकवर गेला आहे.

Aamir Khan At Vipassana Centre Nepal
Aamir Khan At Vipassana Centre Nepal

Aamir Khan At Vipassana Centre Nepal : बॉलिवूड अभिनेता आमिर खानचा ‘लाल सिंह चढ्ढा’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. आमिर खानचा शेवटचा चित्रपट लाल सिंह चड्ढा फ्लॉप झाल्यानंतर आता त्याने चित्रपटांमधून काही काळ ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या काही महिन्यांपासून आमिर खान घरातच वेळ घालवत होता. मात्र, आता तो विपश्यना ध्यानासाठी नेपाळला पोहोचला आहे. आमिर खान नेपाळमधील काठमांडू विमानतळावर स्पॉट झाला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आमिर खान नेपाळमध्ये १० दिवसांसाठी विपश्यना ध्यानात सहभागी होणार आहे. आमिर खान गेल्या काही काळापासून चित्रपटांपासून दूर आहे.

ट्रेंडिंग न्यूज

आपल्या दमदार अभिनयच्या जोरावर बॉलिवूडमध्ये अनेक सुपरहिट चित्रपट देणारा आमिर खान सध्या ब्रेकवर आहे. २०२२मध्ये प्रदर्शित झालेला ‘लाल सिंह चढ्ढा’ हा त्याचा चित्रपट सुपरफ्लॉप ठरला होता. त्याचा हा चित्रपट बिग बजेट होता. मात्र, तो बजेट देखील वसूल करू शकला नाही. यापूर्वी आमिर खानचा 'ठग्स ऑफ हिंदोस्तान' हा चित्रपटही काही खास कामगिरी करू शकला नव्हता. अमिताभ बच्चन, आमिर खान, कतरिना कैफसह अनेक दिग्गज कलाकारांची भरणा असलेला हा चित्रपट लोकांना फारसा आवडला नव्हता.

TDM Movie: महाराष्ट्रात मराठी चित्रपटांची गळचेपी! ‘टीडीएम’ चित्रपटासाठी शिरूरकरांनी काढला ट्रॅक्टर मोर्चा!

सतत फ्लॉप चित्रपट देऊन थकलेला आमिर खान आता ब्रेकवर जात असून, लवकरच धाम्केदार कमबॅक करू शकतो. आमिर खानने बॉक्स ऑफिसवर अनेक विक्रम केले आहेत. मात्र, गेल्या काळात आमिर खानची जादू कमी पडली आहे. त्याचे चित्रपट काही विशेष कामगिरी करू शकलेले नाहीत. एकेकाळी आमिरच्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर अनेक रेकॉर्ड आहेत. २०१६मध्ये आलेला आमिरचा 'दंगल' हा चित्रपट सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत सामील आहे. या चित्रपटाची एकूण कमाई १९२४ कोटी इतकी होती.

मात्र, सध्या आमिर खानची क्रेझ ओसरल्याचे चित्र दिसत आहे. तो चित्रपटांपासून दूर जात ब्रेक घेत आहे. यासाठीच आता आमिर खान नेपाळला पोहोचला आहे. याठिकाणी तो १० दिवस ध्यानधारणा करणार आहे. त्यानंतर तो भारतात परतेल. आमिर खानने चित्रपटांमधून ब्रेक घेण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी देखील त्याने चित्रपटांमधून ब्रेक घेऊन एकांतात वेळ घालवला आहे.

IPL_Entry_Point

विभाग