मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  TDM Movie: महाराष्ट्रात मराठी चित्रपटांची गळचेपी! ‘टीडीएम’ चित्रपटासाठी शिरूरकरांनी काढला ट्रॅक्टर मोर्चा!

TDM Movie: महाराष्ट्रात मराठी चित्रपटांची गळचेपी! ‘टीडीएम’ चित्रपटासाठी शिरूरकरांनी काढला ट्रॅक्टर मोर्चा!

Harshada Bhirvandekar HT Marathi
May 08, 2023 10:48 AM IST

TDM Marathi Movie: ‘टीडीएम’ हा चित्रपट नुकताच महाराष्ट्रात प्रदर्शित झाला आहे. मात्र, ठिकठिकाणी या चित्रपटाचे शो रद्द करून ते हिंदी चित्रपटांना देण्यात आले आहेत.

TDM Marathi Movie
TDM Marathi Movie

TDM Marathi Movie: मराठी सिनेमांना प्राईम टाईम नाहीच, मात्र मराठी सिनेमांना किमान मुबलक शो तरी मिळावेत यासाठी आजवर कित्येक चित्रपट निर्मात्यांनी, कलाकारांनी भाष्य केलं आहे. अशातच भरडला गेलेला एक सिनेमा म्हणजे 'ख्वाडा', 'बबन' या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडेंचा 'टीडीएम' हा चित्रपट. ‘टीडीएम’ हा चित्रपट नुकताच महाराष्ट्रात प्रदर्शित झाला आहे. मात्र, ठिकठिकाणी या चित्रपटाचे शो रद्द करून ते हिंदी चित्रपटांना देण्यात आले. याविरोधात आता संपूर्ण महाराष्ट्र एकवटला आहे. या चित्रपटाला पाठिंबा देण्यासाठी सिनेविश्वात पहिल्यांदाच अचंबित करणारी घटना घडली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

'टीडीएम' या सिनेमाला चित्रपटगृहात शो नसल्या कारणास्तव संतापलेल्या चित्रपट निर्मात्यांनी, दिग्दर्शक, कलाकार मंडळींनी न्याय मागितला. दरम्यान या सर्वांना न्यायाची मागणी करताना अश्रू ही अनावर झाले होते. हा सर्व प्रकार बघून नामवंत राजकीय नेते अजित पवार यांनी देखील 'टीडीएम' चित्रपटांना स्क्रीन मिळण्याबाबत ट्विट केलं होत. मात्र, या सगळ्याचा काहीच उपयोग झाला नाही. शेवटी न राहवून आता 'टीडीएम' चित्रपटाला प्रेक्षकांनी साथ दिली. प्रेक्षकांनी 'हा चित्रपट पाहायचा आहे' असे नारे लगावण्यास सुरुवात केली आहे. 'टीडीएम' चित्रपटाच्या समर्थनार्थ काल छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्ड, शिरूर येथे सर्व शेतकरी बांधवांनी ट्रॅक्टर मोर्चा काढत यांत सहभाग दर्शवला.

Jawan: ‘किंग’ शाहरुख खानसोबत झळकणार मराठीतील ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री; पोस्ट लिहित म्हणाली...

'मराठीची गळचेपी दूर झालीच पाहिजे', 'टीडीएमला प्राईमटाईम शो मिळालेच पाहिजे', 'मला 'टीडीएम' पाहायचाय मुंबई-पुण्यात कुठेच नाही' असे नारे लगावत भव्य ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला होता. एकूणच हे नागरिकांनी, प्रेक्षकांनी केलेलं आंदोलन पाहता त्यांचं 'टीडीएम' चित्रपटावरील, भाऊरावांवरील प्रेम, विश्वास याची प्रचिती येते. खेड्यापाड्यातून स्वमेहनतीने स्वतःचं स्थान निर्माण करणाऱ्या या 'टीडीएम' चित्रपटाच्या संपूर्ण टीममागे आज शेतकरी बांधव उभा आहे, ही वाखाणण्याजोगी बाब आहे.

पुणे शहरात टीडीएम चित्रपटाला फक्त २२ चित्रपटगृह मिळाली होती. तसेच, प्राईम टाईम शो न मिळणे हा चित्रपटावर झालेला अन्याय पाहता या चित्रपटाचे चित्रपटगृहातील प्रदर्शन चित्रपटाचे निर्माते भाऊराव कऱ्हाडे यांनी स्वतः रद्द केले होते. दरम्यान सर्व सामाजिक आणि राजकीय संघटनांनी एकत्र येऊन ‘टीडीएम’ चित्रपटावर आणि भाऊरावांवर झालेला अन्याय पाहता भरघोस पाठिंबा दिला. या सर्व परिस्थितीचा आढावा घेऊन निर्माते हा चित्रपट नव्याने चित्रपटगृहात प्रदर्शित करणार आहेत.

IPL_Entry_Point

विभाग