मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  90s Actor: तब्बू व ऐश्वर्यासह रोमान्स करणाऱ्या अभिनेत्यावर आली शौचालय साफ करण्याची वेळ

90s Actor: तब्बू व ऐश्वर्यासह रोमान्स करणाऱ्या अभिनेत्यावर आली शौचालय साफ करण्याची वेळ

Aarti Vilas Borade HT Marathi
Oct 05, 2023 10:50 AM IST

90s Actor: या अभिनेत्या सुपरस्टार रजनीकांत आणि कमल हासन यांच्यासोबतही स्क्रीन शेअर केली आहे.

mirza abbas ali
mirza abbas ali

९०च्या दशकात दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमधील सुपरस्टार म्हणून रजनीकांत आणि कमल हासन हे ओळखले जात होते. ते चित्रपटांच्या माध्यमातून वेगवेगळे प्रयोग करताना दिसत होते. त्याचवेळी या दोघांना आणखी एक तरुण अभिनेता टक्कर देत होता. या अभिनेत्याचा यशस्वी चित्रपट, मोठे दिग्दर्शक अन् मोठा चाहतावर्ग होता. मात्र, या अभिनेत्याला त्याची ही लोकप्रियता फारशी टिकवता आली नाही. वयाच्या ३०व्या वर्षी तो सुपरस्टार होण्याच्या मार्गावर असल्याचे म्हटले जात होते. मात्र दिवाळखोरी जाहिर करत त्याने चित्रपटसृष्टीला रामराम ठोकला. त्यानंतर त्यांने मिळेल ते काम करण्यास सुरुवात केली. कधी टॅक्सी चालवली तर कधी शौचालय साफ करण्याचे काम केले. आता हा अभिनेता कोण आहे? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

हा अभिनेता म्हणजे मिर्झा अब्बास अली. त्याने १९९६ साली प्रदर्शित झालेल्या ‘कढल देसम’ या चित्रपटात काम केले. या पहिल्यावहिल्या चित्रपटाने त्याला लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचवले होते. त्यानंतर अब्बासचे चित्रपट फ्लॉप ठरले. त्याने रजनीकांतच्या चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारली. त्यापाठोपाठ कमल हासन यांच्या 'हे राम' चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारली. अभिनेत्री ऐश्वर्या राय, तब्बू आणि अजित यांच्या ‘कंदुकोंडाईन कंदुकोंडाईन’ या चित्रपटातही मुख्य भूमिका निभावली.
वाचा: काय फालतूपणा आहे हा; ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ नेटकऱ्यांच्या निशाण्यावर

अब्बासने अनेक चित्रपटांमध्ये काम केले. मात्र, त्याचे सगळे चित्रपट फ्लॉप ठरत होते. त्यानंतर त्याने मालिकांमध्ये नशीब आजमावण्याचा प्रयत्न केले. तरीही तो यशस्वी ठरला नाही.मीडिया रीपोर्टनुसार त्याच्या काही आर्थिक निर्णयांमुळे तो दिवाळखोर झाला. यानंतर चित्रपटसृष्टीला राम राम ठोकत तो न्यूझीलँडमध्ये आला. पोट भरण्यासाठी त्याने अगदी पडेल ते काम केलं. मीडिया रीपोर्टनुसार अब्बासने टॅक्सी चालवणे, मेकॅनिकपासून शौचालय स्वच्छ करण्यापर्यंत सगळी कामं केली.

सध्या अब्बास काय करतो?

अब्बास हा ‘बिग बॉस तमिळ’च्या सातव्या सीझनमुळे चर्चेत आहे. तो या सिझनमध्ये सहभागी होऊन लवकरच पुन्हा मनोरंजनविश्वात काम करणार असल्याचे म्हटले जात आहे. मात्र, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. सोबतच अब्बास मोटीवेशनल स्पीकर म्हणून देखील काम करत आहे.

IPL_Entry_Point

विभाग