मराठी बातम्या  /  निवडणुका  /  Nagpur loksabha Election : नागपूर, गोंदियात ईव्हीएममध्ये बिघाड! मतदान सुरू होण्यास तब्बल १ तास १० मिनिटे उशीर

Nagpur loksabha Election : नागपूर, गोंदियात ईव्हीएममध्ये बिघाड! मतदान सुरू होण्यास तब्बल १ तास १० मिनिटे उशीर

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Apr 19, 2024 12:10 PM IST

Nagpur Loksabha Election 2024 : नागपूरमध्ये सकाळी ७ पासून मतदानाला सुरुवात झाली आहे. पहिल्या टप्प्यातील हे मतदान असून काही केंद्रांवर ईव्हीएममध्ये बिघाडाच्या घटना पुढे आल्या. दिघोरीत यामुळे मतदानाला एक तास उशीर झाला.

नागपूर, गोंदियात ईव्हीएममध्ये बिघाड! मतदान सुरू होण्यास तब्बल १ तास १० मिनिटे उशीर
नागपूर, गोंदियात ईव्हीएममध्ये बिघाड! मतदान सुरू होण्यास तब्बल १ तास १० मिनिटे उशीर (Hindustan Times)

Nagpur Loksabha Election 2024 : राज्यातील पाच जिल्ह्यात पहिल्या टप्प्यातील मतदान आज सकाळ पासून सुरू झाले. सकाळपासून उत्साहात मतदान सुरू असले तरी गोंदिया आणि नागपूरमध्ये काही मतदान केंद्रांवर ईव्हीएम मशीन बंद पाडल्याच्या घटना घडल्या आहेत. यामुळे मतदान सुरू होण्यास उशिर झाला.

ट्रेंडिंग न्यूज

Baramati murder : बारामती येथे जुन्या वादातून हत्याकांड! कोयता व कुऱ्हाडीने हल्ला करत इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्याचा खून

नागपूरच्या दीघोरी केंद्रांवर ईव्हीएममध्ये बिघाड

नागपूर लोकसभा निवडणुकीसाठी दिघोरी मतदान केंद्रांवर इव्हीएम मशीन बंद पडल्याने लोकांना तासभर रांगेत उभे राहावे लागले. जयमाता शाळा या मतदान केंद्रावर झाला. येथील बुथ क्रमांक २४६ येथे नागरिक मतदान करण्यासाठी सकाळी ६.३० वाजतापासून रांगेत लागले होते. मतदानाला ७ वाजता सुरुवात होणे अपेक्षित होते. मात्र, इव्हीएम मशीन सुरू होत नसल्याने मतदान सुरू होऊ शकले नाही. १ तास होऊनही यंत्र सुरू न झाल्याने लोकांमध्ये संताप वाढला. येथील माजी नगरसेवक विजय झलके यांनी यावर आक्षेप घेत अधिकाऱ्यांना जाब विचारला. शेवटी तांत्रिक अडचणीच्या कारणामुळे येथील मशीन बदलण्यात आले. त्यामुळे ७ ऐवजी येथे ८ वाजून १० मिनीटांनी मतदान सुरू करण्यात आले. तर नागपूरच्या बुथ क्रमांक २४८ मध्येही सकाळी ७.३० वाजता अचानक इव्हीएम मशीन बंद पडल्याने मतदान रखडले. यामुळे मतदान करण्यासाठी आलेल्या नागरिकांनी गोंधळ घातला. १५ गे २० मिनिटांनी पुन्हा ईव्हीएम मशीन सुरू करण्यात आले.

Narendra Modi : दहा वर्षांत पहिल्यांदाच नरेंद्र मोदी महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; वर्धा येथे आज जाहीर सभा

गोंदिया येथेही ईव्हीएममध्ये बिघाड झाल्याने तासाभरापासून मतदान ठप्प

गोंदिया येथेही काही केंद्रांवर ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाला. येथील गोरेगाव तालुक्यातील मोहगाव येथील मतदान केंद्रांवर ईव्हीएम मशीन बंद पडल्याने तासाभारांपासून मतदाण बंद पडले आहे. यामुळे नागरिक वैतागले आहेत.

Lok sabha Election 1 phase voting live : राज्यात सकाळी ९ पर्यंत ६.९९ टक्के मतदानाची नोंद; अनेक केंद्रांवर लागल्या रांगा

देवेंद्र फडणवीस यांनी आई आणि पत्नीसह बजावला मतदानाचा हक्क

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या आई आणि पत्नी अमृता फडणवीस यांच्या सोबत आज मतदान केंद्रांवर जाऊन मतदानाचा हक्क बजावला. तर कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देखील त्यांच्या गावी जाऊन मतदानाचा हक्क बजावला आहे.

लोकसभा निवडणुकीचं बिगूल वाजलं आहे. आज लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यातील मतदान सुरू आहे. यामध्ये महाराष्ट्रातील पाच लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे. ज्यामध्ये भंडारा-गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली-चिमूर, नागपूर, रामटेक या लोकसभा मतदारसंंघाचा समावेश आहे.

WhatsApp channel