मराठी बातम्या  /  elections  /  VBA Candidate List : वंचितकडून उमेदवारांची तिसरी यादी जाहीर, ५ जागांसाठी घोषणा, वसंत मोरेंना पुण्यातून उमेदवारी

VBA Candidate List : वंचितकडून उमेदवारांची तिसरी यादी जाहीर, ५ जागांसाठी घोषणा, वसंत मोरेंना पुण्यातून उमेदवारी

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Apr 02, 2024 09:25 PM IST

Vanchit Bahujan Aghadi : वंचित बहुजन आघाडीकडून लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची तिसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. यात वसंत मोरे यांना पुण्यातून तिकीट देण्यात आली आहे.

वंचितकडून  उमेदवारांची तिसरी यादी जाहीर
वंचितकडून  उमेदवारांची तिसरी यादी जाहीर

वंचित बहुजन आघाडीकडून लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची तिसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत एकूण ५ उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहेत. यामध्ये पुणे मतदारसंघासाठी मनसेचा राजीनामा दिलेले वसंत मोरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. शिरूर मंगलदास बांदल यांना उमेदवारी देण्यात आली आहे. बारामतीमध्ये वंचितने उमेदवार न देता सुप्रिया सुळे यांना पाठिंबा जाहीर केला आहे.

याआधी वंचितने पहिल्या यादीत एकूण ८ जागांचा समावेश होता. तर दुसऱ्या यादीमध्ये ११ जागांचा समावेश करण्यात आला होता. आतापर्यंत वंचितने २४ जागांवर आपले उमेदवार दिले आहेत. तिसऱ्या यादीत उमेदवारांच्या नावापुढे त्यांची जातीचाही उल्लेख करण्यात आला आहे. यात तीन उमेदवार मराठा उमेदवार आहेत तर एक लिंगायत तर एक मुस्लिम आहे.

वंचितची तिसरी उमेदवार यादी –

नांदेड – अविनाश भोईकर -लिंगायत

परभणी – बाळासाहेब भुजंगराब उगळे – मराठा

औरंगाबाद -अफसर खान – मुस्लिम

पुणे – वसंत मोरे – मराठा

शिरुर - मंगलदास बांदल - मराठा

 

मनसेतून बाहेर पडलेले वसंत मोरे (Vasant More) यांनी अद्याप कोणत्याही पक्षात प्रवेश केलेला नाही. पुणे लोकसभेसाठी इच्छूक असलेले मोरे यांनी राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळवण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर मोरे यांनी वंचित (Vanchit Bahujan Aghadi) चे समर्थन मिळवण्यासाठी मुंबईत प्रकाश आंबेडकरांची भेट घेतली. जरांगे यांनी मराठा समाजाचे उमदेवार देण्याबाबत घुमजाव केल्यानंतर आता पुण्यातून वंचितकडून मोरे यांना उमेदवारी मिळाली आहे. 

WhatsApp channel