मराठी बातम्या  /  निवडणुका  /  Parbhani boycott Election: परभणीच्या बलसा खुर्द येथील गावकऱ्यांचा मतदानावर घातला बहिष्कार; समोर आले 'हे' कारण

Parbhani boycott Election: परभणीच्या बलसा खुर्द येथील गावकऱ्यांचा मतदानावर घातला बहिष्कार; समोर आले 'हे' कारण

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Apr 26, 2024 03:36 PM IST

Parbhani Balsa Khurd boycott Election: परभणीच्या बलसा खुर्द येथील गावकऱ्यांनी मतदानावर बहिष्कार घातल्याची माहिती समोर आली.

भरभणीच्या बलसा खुर्द येथील गावकऱ्यांनी मतदानावर बहिष्कार घातला.
भरभणीच्या बलसा खुर्द येथील गावकऱ्यांनी मतदानावर बहिष्कार घातला. (HT)

Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रात ८ ठिकाणी मतदान सुरू आहे, ज्यात बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ- वाशिम, परभणी, नांदेड आणि हिंगोली लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे. दरम्यान, मतदार आपला मतदानाचा हक्क बजावत असताना परभणीच्या बलसा खुर्द येथील गावकऱ्यांनी चक्क मतदानावर बहिष्कार घातल्याची माहिती समोर आली. अतिक्रमण काढण्याच्या मागणीसाठी गावकऱ्यांनी मतदानावर बहिष्कार घातल्याचे समजले. ही बाब जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या लक्षात येताच त्यांनी स्वत: बलसा खुर्द गावात जाऊन गावकऱ्यांना मतदान करण्याचे आवाहन केले. तसेच लेखी पत्राद्वारे अतिक्रमण हटवण्याचे आश्वासन दिले. यानंतर गावकऱ्यांनी पुन्हा मतदानाला सुरुवात केली.

Loksabha Election 2024 : राज्यात अनेक ठिकाणी ईव्हीएममध्ये बिघाड! निवडणूक अधिकाऱ्यांची धावपळ, मतदार ताटकळले

जिल्हाधिकाऱ्यांचा गावकऱ्यांशी संवाद

मराठवाड्यातील हिंगोली, नांदेड आणि परभणी मतदारसंघात शुक्रवारी (२६ एप्रिल २०२४) सकाळी मतदानाला सुरुवात झाली. परंतु, परभणी लोकसभा मतदारसंघातील बलसा खुर्द येथील गावकऱ्यांनी अतिक्रमणाच्या मुद्द्याला विरोध मतदानावर बहिष्कार टाकला. याबाबत माहिती मिळताच रघुनाथ गावडे यांनी बलसा खुर्द येथे जाऊन ग्रामस्थांशी संवाद साधला आणि त्यांना मतदान करण्याचे आवाहन केले.

SC on VVPAT : ईव्हीएमनेच होणार मतदान; मतदान केल्याची प्रत्येक स्लीप तपासण्याची मागणी फेटाळली! सुप्रीम कोर्टाचा निर्णय

बलसा खुर्द गावात १ हजार २०० मतदार

१ हजार २०० मतदार असलेल्या गावाने अतिक्रमणाच्या दीर्घकाळापासून निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता.जिल्हाधिकाऱ्यांनी ग्रामस्थांची बैठक घेतली, त्यांनी प्रशासनाकडून समस्या सोडविण्याचे आश्वासन मागितले. निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर आम्ही अतिक्रमणाच्या मुद्द्यावर बैठक घेऊ आणि महिनाभरात या समस्येवर मार्ग काढू, असे गावडे यांनी सांगितले. प्रशासनाने प्रश्न सोडवण्याचे लेखी आश्वासन दिल्यास ग्रामस्थ मतदानाचा हक्क बजावतील, असे गावकऱ्यांनी सांगितले. यानंतर लेखी अश्वासन देताच गावकऱ्यांनी मतदार केंद्राकडे धाव घेतली.

महाराष्ट्रातील ८ मतदारसंघात आज मतदान

बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ- वाशिम, परभणी, नांदेड आणि हिंगोली या आठ मतदारसंघातील १६,५८९ मतदान केंद्रांवर एकूण १,४९,२५,९१२ पात्र मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. कुठे नवरदेवाने लग्नाच्या बोहल्यावर चढण्यापूर्वी मतदान केले. तर, एका मतदाराने माकडाला सोबत नेऊन मतदानाचा हक्क बजावला.

WhatsApp channel