मराठी बातम्या  /  निवडणुका  /  Lok sabha Election 2 phase voting live : राज्यात ८ मतदारसंघात दुपार पर्यंत २५ टाक्याहून अधिक मतदानाची नोंद

Lok sabha Election 2 phase voting live : राज्यात ८ मतदारसंघात दुपार पर्यंत २५ टाक्याहून अधिक मतदानाची नोंद

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Apr 26, 2024 02:39 PM IST

Lok sabha Election 2 phase voting live : भारतीय लोकशाही उत्सवाचा दूसरा टप्पा आज पार पडत आहे. महाराष्ट्रात ८ जागांवर तर देशात ८८ जागांवर आज मतदान होणार आहे. या टप्प्यात १६७ लाख मतदान केंद्रांवर १६ लाखांहून अधिक मतदान अधिकारी तैनात करण्यात आले आहेत. तर १५.८८ कोटी मतदार आज मतदानाचा हक्क बजावतील.

१३ राज्ये, ८८ जागा; लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी मतदानाला सुरुवात
१३ राज्ये, ८८ जागा; लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी मतदानाला सुरुवात

Lok sabha election phase 2 voting today: लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात आज, शुक्रवारी, २६ एप्रिल रोजी मतदान होत आहे. १३ राज्यांतील ८८ जागांवर मतदान होणार आहे. तर महाराष्ट्रात ८ जागावर मतदान होणार आहे. दुसऱ्या टप्प्यात केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघाचाही समावेश आहे, येथून काँग्रेस नेते राहुल गांधी सलग दुसऱ्यांदा निवडणूक लढवत आहेत. केरळच्या सर्व २० जागांव्यतिरिक्त, कर्नाटकच्या २८ जागांपैकी १४, राजस्थानच्या १३ जागा, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशच्या प्रत्येकी ८ जागा, मध्य प्रदेशच्या ६ जागा, आसाम आणि बिहार, छत्तीसगड आणि पश्चिम बंगालच्या प्रत्येकी ५ जागांवर मतदान होत आहे. मणिपूर, त्रिपुरा आणि जम्मू-काश्मीरमध्ये प्रत्येकी तीन आणि प्रत्येकी एका जागेवर निवडणूक होणार आहे.

दुसऱ्या टप्प्यात ८९ जागांवर मतदान होणार असले तरी मध्य प्रदेशातील बैतुल मतदारसंघात बहुजन समाज पक्षाच्या उमेदवाराचा मृत्यू झाल्याने आता तिसऱ्या टप्प्यात मतदान होणार आहे. निवडणूक आयोगाने सांगितले की, या टप्प्यात १.६७ लाख मतदान केंद्रांवर १६ लाखांहून अधिक मतदान अधिकारी तैनात करण्यात आले आहेत. ते म्हणाले की या टप्प्यात १५.८८ कोटींहून अधिक मतदार आहेत, ज्यामध्ये ८,०८ कोटी पुरुष, ७.८ कोटी महिला आणि ५ हजार ९२९ तृतीय पंथिय मतदार आहेत. ३४.८ लाख मतदार पहिल्यांदा मतदान करणारे तर २०-२९ वयोगटातील ३.२८ कोटी मतदार आहेत.

वंचित बहुजनचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी बजावला मतदानाचा हक्क 

राज्यात ८ मतदारसंघात ९ वाजे पर्यंत ८ टक्के मतदानाची नोंद झाली. अकोला येथे प्रकाश आंबेडकर यांनी सपत्नीक मतदानाचा हक्क बजावला.
राज्यात ८ मतदारसंघात ९ वाजे पर्यंत ८ टक्के मतदानाची नोंद झाली. अकोला येथे प्रकाश आंबेडकर यांनी सपत्नीक मतदानाचा हक्क बजावला.

राज्यातील ८ मतदार संघात सकाळी ७ ते ९ पर्यंत ८ टक्के मतदानांची नोंद

वर्धा -७.१८ टक्के

अकोला - ७.१७ टक्के

अमरावती -६.३४ टक्के

बुलढाणा - ६.३१ टक्के

हिंगोली - ७.२३ टक्के

नांदेड - ७.१३ टक्के

परभणी - ९.७२ टक्के

यवतमाळ - वाशिम - ७.२३ टक्के

पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान दोन गटांमध्ये हाणामारी

पश्चिम बंगालमधील बालूरघाटमध्ये दोन गटांमध्ये हाणामारी झाली आहे. टीएमसी आणि भाजपचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. यावेळी भाजप नेते सुकांत मजुमदार उपस्थित होते. टीएमसी कार्यकर्त्यांनी मतदान केंद्रासमोर निदर्शने केली. त्यांनी मजुमदार यांच्यावर शांतता भंग केल्याचा आरोप केला.

हिंगोलीत पहिल्या दोन तासांमध्ये मतदानात अडथळे! ३९ बॅलेट मशीन तर १६ कंट्रोल युनिट बदलले

दुसऱ्या टप्प्यातील मतदानात अनेक अडथळे आले आहेत. सकाळपासून उत्साहात मतदान सुरू असले तरी वर्धा आणि अमरावतीत मतदान केंद्रांवर ईव्हीएम मशीन बंद पाडल्याच्या घटना घडल्या आहेत. यामुळे मतदान सुरू होण्यास उशीर झाला. तर हिंगोलीत ३९ मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीन तर १६ व्हीव्ही पॅट मतदानासाठी अडथळा आला आहे.

ट्विटरवर मतदानाबाबत काय म्हणाले पंतप्रधान मोदी?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवर पोस्ट केले, ‘लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील सर्व जागांच्या मतदारांना आज माझी नम्र विनंती आहे की त्यांनी विक्रमी संख्येने मतदान करावे. जितके जास्त मतदान होईल तितकी आपली लोकशाही मजबूत होईल. आमचे तरुण मतदारांना तसेच देशातील महिला शक्तींना माझे विशेष आवाहन आहे की त्यांनी उत्साहाने मतदानासाठी पुढे यावे. तुमचे मत तुमचा आवाज आहे!’

राहुल द्रविडने बेंगळुरूमध्ये मतदान केले

माजी क्रिकेटपटू राहुल द्रविडने कर्नाटकातील बेंगळुरू येथे मतदान केले. यावेळी राहुल म्हणाला, “प्रत्येकाने बाहेर पडून मतदान केले पाहिजे. लोकशाहीत ही संधी मिळते.

केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांनी बेंगळुरू येथे मतदान केले

वर्धा जिल्ह्यातील देवळी येथील यशवंत कन्या विद्यालयात मतदान यंत्र बंद

वर्धा जिल्ह्यातील देवळी येथे यशवंत कन्या विद्यालयात इव्हीएममध्ये बिघाड झाल्याने मतदान अद्याप सुरू झालेले नाही. सकाळ पासून मतदार या मतदांन केंद्रांवर रांगा लावून आहेत. अर्धा तास होऊन देखील येथे मतदान सुरू होऊ शकले नाही. अमरावती येथे देखील एका केंद्रांवर ईव्हीएममध्ये बिघाड झाल्याची माहिती आहे.

महाराष्ट्रातील मतदान केंद्रावर सकाळपासून रांगा

महाराष्ट्रात दुसऱ्या टप्यात मतदानाला सुरुवात झाली. सकाळी ६.३० पासून मतदारांनी रांगा लावल्या आहेत. मतदारांना आकर्षित करण्यासाठी केंद्रांना सजवण्यात आले आहे. हिंगोली, यवतमाळ, अमरावती, वर्धा जिल्ह्यात मतदारांच्या रांगा लागल्या आहेत.

दुसऱ्या टप्प्यातील मतदान सुरू

लोकसभा निवडणूक २०२४ दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे. देशातील विविध राज्यांतील मतदान केंद्रांसमोर मतदारांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. मतदानाबाबत लोकांमध्ये उत्साह आहे.

मतदानाची वेळ वाढवली

उष्मा आणि उष्णतेची लाट लक्षात घेऊन निवडणूक आयोगाने बिहारमधील चार लोकसभा मतदारसंघातील अनेक मतदान केंद्रांवर मतदानाची वेळ वाढवली आहे. भारतीय हवामान खात्याने पुढील पाच दिवसांत पश्चिम बंगाल, ओडिशा, बिहार, झारखंड, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक आणि उत्तर प्रदेशच्या अनेक भागांमध्ये उष्णतेची लाट आणि तीव्र उष्णतेच्या लाटेचा इशाराही जारी केला आहे. त्रिपुरा, केरळ, किनारी कर्नाटक आणि आसाममध्ये उच्च आर्द्रतेमुळे लोकांना समस्यांना सामोरे जावे लागू शकते, असे विभागाने म्हटले आहे.

दुसऱ्या टप्प्यात १२०२ उमेदवार रिंगणात आहेत, ज्यामध्ये १०९८ पुरुष आणि १०२ महिला आहेत. दुसऱ्या टप्प्यातील प्रचार बुधवारी सायंकाळी संपला. मतदान आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांन मतदान केंद्रावर पोहचवण्यासाठी तीन हेलिकॉप्टर, चार विशेष गाड्या आणि ८० हजार वाहने तैनात करण्यात आली आहेत.

काँग्रेस नेते शशी थरूर, केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर, कार्यवाह अरुण गोविल, कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांचे भाऊ डीके सुरेश (काँग्रेस), कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी (जनता दल सेक्युलर) यांचा प्रमुख उमेदवारांच्या यादीत समावेश आहे. तर भाजपचे उमेदवार हेमा मालिनी, ओम बिर्ला आणि गजेंद्र सिंह शेखावत यांना आपापल्या मतदारसंघातून सलग तिसऱ्यांदा विजयाची आशा आहे.

Narayan Rane: लोकसभा निवडणुकीनंतर उद्धव यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचा नायनाट होईल: नारायण राणे

पहिल्या टप्प्यात १०२ जागांवर मतदान झाले

एकूण २१ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील १०२ जागांसाठी गेल्या शुक्रवारी झालेल्या मतदानाच्या पहिल्या टप्प्यात जवळपास ६५.६ टक्के मतदान झाले. शुक्रवारी दुसऱ्या टप्प्यातील मतदानानंतर केरळ, राजस्थान आणि त्रिपुरामध्ये निवडणुका पूर्ण होतील. तर पहिल्या टप्प्यात १९ एप्रिल रोजी तामिळनाडू (३९), उत्तराखंड (पाच), अरुणाचल प्रदेश (दोन), मेघालय (दोन), अंदमान आणि निकोबार बेटे (एक), मिझोराम (एक), नागालँड (एक), पुद्दुचेरी. (एक) ), सिक्कीम (एक) आणि लक्षद्वीप (एक) असे मतदान पार पडले आहे,

लोकसभा निवडणुकीत २०१९ मध्ये, राष्ट्रीय लोकशाही आघाडीने या ८९ जागांपैकी ५६ जागा जिंकल्या आणि संयुक्त पुरोगामी आघाडीने (UPA) २४ जागा जिंकल्या. त्यापैकी सहा जागा सीमांकनानंतर निघाल्या आहेत. केरळमध्ये २,७७,४९,१५९ पात्र मतदारांपैकी पाच लाखांहून अधिक मतदार पहिल्यांदाच मतदान करतील.

Varsha Gaikwad : काँग्रेसची खेळी! मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून वर्षा गायकवाड यांना तिकीट

या दिग्गजांचे भवितव्य मतपेटीत होणार बंद

राहुल हे वायनाडचे विद्यमान खासदार आहेत आणि त्यांचा सामना भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या (सीपीआय) ॲनी राजा आणि के. सुरेंद्रन यांचा आहे. शशी थरूर चौथ्यांदा तिरुअनंतपुरम मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत आणि त्यांचा सामना भाजपच्या चंद्रशेखर आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे (सीपीआय-एम) पन्नियान रवींद्रन यांच्याशी आहे. मथुरा लोकसभा जागेवर २०१४ पासून भाजपचा झेंडा फडकवणाऱ्या हेमा मालिनी यांचा सामना काँग्रेसचे मुकेश धनगर यांच्याशी आहे, तर काँग्रेसचे प्रल्हाद गुंजाळ हे कोटाचे दोन वेळा खासदार ओम बिर्ला यांना आव्हान देत आहेत.

Uddhav thackeray: आमचे सरकार आल्यानंतर...; ठाकरेंच्या शिवसेनेचा जाहीरनामा प्रसिद्ध, जनतेला काय काय आश्वासन दिली?

केंद्रीय मंत्री शेखावत सलग तिसऱ्यांदा जोधपूर मतदारसंघातून निवडणूक लढवत असून त्यांचा सामना काँग्रेसचे उमेदवार करणसिंग उचियार्डा यांच्याशी आहे. बेंगळुरू दक्षिणचे विद्यमान खासदार आणि भारतीय जनता युवा मोर्चा (BJYM) च्या राष्ट्रीय अध्यक्ष तेजस्वी सूर्या यांचा सामना काँग्रेसच्या सौम्या रेड्डी यांच्याशी होणार आहे.

 

छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते भूपेश बघेल हे 30 वर्षांहून अधिक काळ भाजपचा बालेकिल्ला असलेल्या राजनांदगावमधून निवडणूक लढवत आहेत. 'रामायण' या टीव्ही मालिकेत भगवान रामाची भूमिका साकारणारा अरुण गोविल मेरठ लोकसभा मतदारसंघातून बहुजन समाज पक्षाचे (BSP) देवव्रत कमर त्यागी आणि समाजवादी पक्षाच्या (SP) सनिता वर्मा यांच्या विरोधात निवडणूक लढवत आहे.

WhatsApp channel