मराठी बातम्या  /  निवडणुका  /  Amit Shah On Pawar : शरद पवार म्हणतात, अमरावतीकरांची माफी मागतो, मग ‘त्या’ कुटुंबांची माफी कधी मागणार?, अमित शहांचा सवाल

Amit Shah On Pawar : शरद पवार म्हणतात, अमरावतीकरांची माफी मागतो, मग ‘त्या’ कुटुंबांची माफी कधी मागणार?, अमित शहांचा सवाल

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Apr 24, 2024 10:52 PM IST

Amit Shah On Sharad Pawar : तुम्ही १० वर्षे केंद्रात कृषीमंत्री असताना शेतकऱ्यांसाठी काय केलं. तुमच्या कार्यकाळात विदर्भातील शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्यांच्या कुटुंबियांचीही माफी मागा, असा हल्लाबोल अमित शहांनी पवारांवर केला.

 ‘त्या’ कुटुंबांची माफी कधी मागणार?, अमित शहांचा शरद  पवारांना सवाल
‘त्या’ कुटुंबांची माफी कधी मागणार?, अमित शहांचा शरद पवारांना सवाल

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीतील दुसऱ्या टप्प्यातील प्रचाराची आज सांगता झाली. अमरावती मतदारसंघात (Amravati lok sabha ) दुसऱ्या टप्प्यात मतदान होणार आहे. अमरावतीतील भाजपच्या उमेदवार नवनीत राणा (Navneet Rana) यांच्या प्रचारासाठी अमित शहा (Amit Shah) यांनी आज प्रचारसभा झाली. यावेळी त्यांनी शरद पवारांसह उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. तुम्ही कृषीमंत्री असताना आत्महत्या विदर्भात झालेल्या शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांची माफी मागा, असं अमित शहा म्हणाले.

नवनीत राणा यांना उमेदवारी दिल्यानं शरद पवार (Sharad Pawar) यांनी अमरावतीकरांची माफी मागत माझ्याकडून चूक झाल्याचे पवार म्हणाले होते. यावरून अमित शहांनी शरद पवारांना टार्गेट केलं आहे. तुम्ही १० वर्षे केंद्रात कृषीमंत्री होतात, त्या काळात शेतकऱ्यांसाठी काय केलं. तुमच्या कार्यकाळात विदर्भातील शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्यांच्या कुटुंबियांचीही माफी मागा, असा हल्लाबोल अमित शहांनी पवारांवर केला.

अमित शहा म्हणाले तुम्ही नवनीत राणांना दिलेलं प्रत्येक मत मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवणारं असेल. देशाला दहशतवाद, नक्षलवाद मुक्तीकडे नेण्यासाठी मत असेल. काँग्रेसने ७० वर्षात अयोध्येत राम मंदिर होऊ दिलं नाही. मोदींनी पाच वर्षात राम मंदिराचा प्रश्न मार्गी लावला. या मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेचं निमंत्रण उद्धव ठाकरेंसह, शरद पवार आणि राहुल गांधींना दिलं होतं. पण ते आले नाहीत. नकली शिवसेनेचे अध्यक्ष प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला गेले नाहीत. मोदींनी राम मंदिरासोबतच काशी-विश्वनाथ कॉरिडॉर बनवला आहे.

काश्मीरमधील कलम ३७० या अनौरस बाळाला सांभाळण्याचे काम काँग्रेसने केले. काँग्रेस वोट बँकेचं राजकारण करत आली आहे. उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) बाळासाहेबांचे विचार सोडून दिले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बाळासाहेब ठाकरेंचे विचार घेऊन पुढे जात आहेत. राज्याचा विकास शिंदे-फडणवीस सरकारच्या काळात होत आहे.

तर तेव्हाच संविधान बदललं असतं –

४०० पार जागा संविधान बदलण्यासाठी पाहिजेत, असा खोटा प्रचार विरोधकांकडून केला जात आहे. काँग्रेसकडून हा अपप्रचार केला जात आहे. जर आम्हाला संविधान बदलायचं असते तर २०१४ मध्येच पूर्ण बहुमत होतं. तेव्हाच बदललं असते. मात्र आम्ही बहुमताचा वापर करून कलम ३७० हटवलं,  तिहेरी तलाकवर बंदी आणली.

WhatsApp channel