मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  IPL 2024 : कोण आहे गुजरात टायटन्सची ती ‘मिस्ट्री गर्ल’? जिच्यावर अख्खा सोशल मीडिया फिदा झाला!

IPL 2024 : कोण आहे गुजरात टायटन्सची ती ‘मिस्ट्री गर्ल’? जिच्यावर अख्खा सोशल मीडिया फिदा झाला!

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Apr 19, 2024 08:28 PM IST

GT Vs DC Mystery Girl : गुजरात आणि दिल्ली यांच्यातील सामन्याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक मुलगी स्टँडमध्ये बसलेली आहे. विशेष म्हणजे ही मिस्ट्री गर्ल अगदी स्पॅनिश अभिनेत्री ॲना डी आर्मास हिच्यासारखी दिसते.

IPL 2024 : कोण आहे गुजरात टायटन्सची ती ‘मिस्ट्री गर्ल’? जिच्यावर अख्खा सोशल मीडिया फिदा झाला!
IPL 2024 : कोण आहे गुजरात टायटन्सची ती ‘मिस्ट्री गर्ल’? जिच्यावर अख्खा सोशल मीडिया फिदा झाला!

आयपीएल २०२४ मध्ये बुधवारी (१७ एप्रिल) गुजरात टायटन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना खेळला गेला. या सामन्यात दिल्लीने गुजरातला अवघ्या ९० धावांत गुंडाळले आणि त्यानंतर ८.१ षटकात ६ गडी राखून सामना जिंकला.

ट्रेंडिंग न्यूज

मात्र, आता या सामन्यापेक्षा स्टँडमध्ये बसलेल्या एका मुलीचीच अधिक चर्चा होत आहे. ही मिस्ट्री गर्ल स्पॅनिश अभिनेत्री आणि मॉडेल ॲना डी आर्मास हिच्यासारखीच दिसते.

वास्तविक, गुजरात आणि दिल्ली यांच्यातील सामन्याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक मुलगी स्टँडमध्ये बसलेली आहे. विशेष म्हणजे ही मिस्ट्री गर्ल अगदी स्पॅनिश अभिनेत्री ॲना डी आर्मास हिच्यासारखी दिसते.

यानंतर आता ती मुलगी खरंच अभिनेत्री ॲना डी आर्मास आहे का? तर नाही, असे अजिबात नाही. पण सामन्यादरम्यान व्हायरल झालेली ही मिस्ट्री गर्ल अगदी हुबेहुब स्पॅनिश अभिनेत्री ॲना डी आर्मास सारखीच दिसते.

ॲना डी आर्मास कोण आहे?

ॲना डी आर्मास ही क्यूबन आणि स्पॅनिश अभिनेत्री आहे. ॲनाने क्यूबन रोमँटिक चित्रपट 'उना रोजा डी फ्रान्सिया' मध्ये मुख्य भूमिकेतून आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली. वयाच्या १८व्या वर्षी, ती माद्रिद, स्पेन येथे राहायला गेली. ॲना डी आर्मासने २००७ ते २०१० या दरम्यान चाललेल्या 'एल इंटरनाडो' या लोकप्रिय मालिकेतील सहा सीझनमध्ये अभिनेत्री म्हणून काम केले.

gujarat titans mystery girl
gujarat titans mystery girl

इंस्टाग्रामवर १० मिलियन्सहून अधिक फॉलोअर्स

ॲना डी आर्मासचे जगभरात फॅन फॉलोअर्स आहेत. तिचे चाहते सर्वत्र आहेत. सर्वात लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म, इन्स्टाग्रामवर ॲनाचे १३.६ मिलियन्सहून अधिक फॉलोअर्स आहेत.

स्पॅनिश अभिनेत्री आणि मॉडेल ॲना खूपच हॉट आहे. ती अनेकदा तिच्या फोटोंमुळे सोशल मीडियाचे तापमान वाढवत असते.

IPL २०२४ मध्ये गुजरातची आतापर्यंतची कामगिरी

आयपीएल २०२४ मध्ये गुजरात टायटन्सची कामगिरी काही विशेष झाली नाही. शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील गुजरात टायटन्सने ७ पैकी ३ सामने जिंकले आहेत, तर ४ सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. IPL २०२४ च्या गुणतालिकेत गुजरातचा संघ ६ गुणांसह आठव्या स्थानावर आहे.

IPL_Entry_Point