महिला प्रीमियर लीगचा (WPL 2024) दुसरा हंगाम २३ फेब्रुवारी २०२४ पासून सुरू होत आहे. या लीगमधील पाचही संघांची तयारी पूर्ण झाली आहे. स्पर्धेतील पहिला सामना गतविजेत्या मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात होणार आहे. ही स्पर्धा एकूण दोन ठिकाणी खेळवली जाणार आहे.
अशा परिस्थितीत चाहते महिलांच्या या सर्वात मोठ्या स्पर्धेची आतुरतेने वाट पाहत आहेत. पण त्याआधी WPL 2024 च्या पहिल्या सामन्याशी संबंधित काही महत्त्वाची माहिती जाणून घेऊया.
WPL २०२४ चा पहिला २३ फेब्रुवारी २०२४ रोजी खेळला जाणार आहे.
WPL २०२४ चा पहिला सामना मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात होणार आहे.
WPL २०२४ चा पहिला सामना बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवला जाईल.
WPL २०२४ चे सामन्यांचे थेट प्रक्षेपण स्पोर्ट्स 18 च्या विविध चॅनेलवर आणि कलर्स सिनेप्लेक्सवर लाईव्ह पाहता येतील.
WPL २०२४ च्या सामन्यांचे लाईव्ह स्ट्रिमिंग Jio Cinema ॲप आणि वेबसाइटवर पूर्णपणे विनामूल्य पाहता येईल.
मुंबई इंडियन्सचा संघ - अमनजोत कौर, अमेलिया केर, क्लो ट्रायॉन, हरमनप्रीत कौर (कर्णधार), हेली मॅथ्यूज, हुमैरा काझी, इस्सी वोंग, जिंतीमनी कलिता, नॅट सीव्हर-ब्रंट, पूजा वस्त्राकर, प्रियांका बाला, सायका इशाक, यास्तिका भाटिया, शबनीम इस्माईल, फातिमा जाफर, कीर्तना बालकृष्णन.
दिल्ली कॅपिटल्स- ॲलिस कॅप्सी, अरुंधती रेड्डी, जेमिमाह रॉड्रिग्स, जेस जोनासेन, लॉरा हॅरिस, मारिझाना कॅप, मेग लॅनिंग (कर्णधार), मिन्नू मणी, पूनम यादव, राधा यादव, शेफाली वर्मा, शिखा पांडे, स्नेहा दीप्ती, तानिया भाटिया, तितास साधू, ॲनाबेल सदरलँड, अश्वनीकुमारी.
संबंधित बातम्या