मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  IPL 2024 : आयपीएलचं वेळापत्रक कधी जाहीर होणार? समोर आली महत्वाची माहिती, पाहा

IPL 2024 : आयपीएलचं वेळापत्रक कधी जाहीर होणार? समोर आली महत्वाची माहिती, पाहा

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Feb 19, 2024 04:58 PM IST

IPL 2024 Schedule : आयपीएलचा १७ वा सीझन मार्चच्या अखेरीस सुरू होऊ शकतो. सध्या टीम इंडियाचे खेळाडू इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत व्यस्त आहेत

IPL 2024 Schedule
IPL 2024 Schedule (PTI)

आयपीएलच्या (IPL 2024)  आगामी मोसमाबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. आयपीएल १७ चे वेळापत्रक एकाच वेळी जाहीर केले जाणार नाही. कारण यंदा लोकसभेच्या निवडणुका होणार असल्याने आयपीएल २०२४ मध्ये काही अडचणी येण्याची शक्यता आहे. सध्या आयपीएलचे वेळापत्रक तयार करण्याचे काम सुरू आहे. 

विशेष म्हणजे, लोकसभा निवडणूक असूनही आयपीएलचा १७ वा सीझन भारतातच खेळवला जाणार आहे. एका माडिया रिपोर्टमध्ये सांगण्यात आले  आहे की, आयपीएलचे वेळापत्रक तयार केले जात आहे. बरेच काही ठरवले गेले आहे. मात्र, गृह मंत्रालय आणि निवडणूक आयोगाची परवानगी मिळाल्यानंतरच आयपीएल वेळापत्रकाची अंतिम घोषणा केली जाईल'.

या रिपोर्टमध्ये पुढे सांगण्यात आले की, “सर्व संघांच्या सुरुवातीच्या सामन्यांचे वेळापत्रक आधी जाहीर केले जाईल. यानंतर मतदानाबाबतचे चित्र स्पष्ट होताच सर्व संघांच्या उर्वरित सामन्यांचे वेळापत्रकही जाहीर केले जाईल".

आयपीएलचा १७ वा सीझन मार्चच्या अखेरीस सुरू होऊ शकतो. सध्या टीम इंडियाचे खेळाडू इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत व्यस्त आहेत. कसोटी मालिका संपल्यानंतर खेळाडूंना काही दिवसांची विश्रांती दिली जाणार आहे.

एवढेच नाही तर यावर्षी टी-20 वर्ल्डकपदेखील होणार आहे. या पार्श्वभूमीवर बीसीसीआय खेळाडूंच्या कामाचा भार सांभाळण्यावरही लक्ष देणार आहे. आयपीएलचा अंतिम सामना २६ मे रोजी खेळवला जाऊ शकतो. तसेच, ज्या खेळाडूंचे संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडतील त्यांना विश्वचषकाच्या तयारीसाठी आधीच अमेरिकेला पाठवले जाऊ शकते.

IPL_Entry_Point