मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Zomato : मोठी बातमी! झोमॅटोनं २२५ शहरांतून गाशा गुंडाळला; शेअरही गडगडला!

Zomato : मोठी बातमी! झोमॅटोनं २२५ शहरांतून गाशा गुंडाळला; शेअरही गडगडला!

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Feb 13, 2023 03:07 PM IST

Zomato Share Price : वाढत जाणारा तोटा व काही शहरांत मिळणारा अल्प प्रतिसाद लक्षात घेऊन झोमॅटोनं २२५ शहरांतील सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

Zomato
Zomato

Zomato Share Price : ऑनलाइन फूड डिलिव्हरीमध्ये अल्पावधीतच नावारुपास आलेली व साधारण दीड वर्षांपूर्वी शेअर बाजारात नोंदणी झालेली झोमॅटो कंपनी डबघाईला आल्याचं चित्र आहे. ताज्या तिमाही निकालात कंपनीच्या तोट्यात वाढ झाली असून विदेशानंतर आता भारतातही कंपनी आपला व्यवसाय गुंडाळत चालली आहे. पुढच्या काही दिवसांत भारतातील २२५ शहरांतील सेवा बंद करण्याचा निर्णय कंपनीनं घेतला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

झोमॅटोनं डिसेंबर तिमाहीचे निकाल जाहीर करताना पुढील वाटचालीची माहिती दिली आहे. देशातील २२५ छोट्या शहरांतील सेवा बंद करण्याचा निर्णय झाला आहे. या शहरांमध्ये कंपनीची कामगिरी आणि मागणी फारशी उत्साहवर्धक नव्हती. 

डिसेंबर अखेरच्या तिमाहीत कंपनीला ३४६.६० कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. याआधी वर्षभरापूर्वी डिसेंबर तिमाहीत कंपनीला ६७.२ कोटी रुपयांचा तोटा झाला होता. फूड डिलिव्हरीच्या व्यवसायात घट हे यामागचं कारण आहे.

अर्थात, असं असलं तरी या कालावधीत कंपनीचं ऑपरेटिंग प्रॉफिट १,११२ कोटींवरून १९४८.२० कोटी इतके वाढल आहे. तर, एकूण खर्च रु. २४८५.३ कोटींवर गेला आहे.

निकालानंतर शेअर्समध्ये घसरण

तिमाही निकालानंतर झोमॅटोच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे. मागील आठवड्याच्या शेवटच्या दिवशी घसरलेला कंपनीचा शेअर आजही १.६० टक्यांनी घसरून ५२.४५ रुपयांवर ट्रेड करत आहे. २०२१ च्या जुलै महिन्यात झोमॅटोचा IPO लॉन्च झाला होता.

WhatsApp channel

विभाग