मराठी बातम्या  /  बिझनेस  /  dividend news : सरकारी कंपनीनं केली डिविडंडची घोषणा; एका शेअरमागे किती रुपये मिळणार पाहा!

dividend news : सरकारी कंपनीनं केली डिविडंडची घोषणा; एका शेअरमागे किती रुपये मिळणार पाहा!

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Feb 13, 2023 01:26 PM IST

MSTC dividend Announcement news : सरकारी कंपनी एमएसटीसीनं आपल्या गुंतवणूकदारांना खूशखबर दिली आहे.

Dividend
Dividend

MSTC dividend Announcement news : शेअर बाजारात गुंतवणूक करताना योग्य कंपनीची निवड केल्यास गुंतवणूकदारांना अनेक प्रकारे फायदा मिळण्याची शक्यता असते. हा फायदा कधी शेअरच्या किंमतीमधील वाढीमुळं होऊ शकतो, कधी बोनस शेअर्स मिळाल्यामुळं होतो तर कधी लाभांशामुळं होतो. यातील लाभांशाच्या बाबतीत सरकारी कंपन्या आघाडीवर असतात. सरकारच्या अखत्यारीतील एमएसटीसी (MSTC) लिमिटेड या कंपनीत दीर्घकालीन गुंतवणूक करणाऱ्यांना असाच फायदा होणार आहे.

ट्रेंडिंग न्यूज

एमएसटीसी कंपनीनं आपल्या पात्र गुंतवणूकदारांसाठी लाभांश जाहीर केला आहे. या लाभांशासाठी रेकॉर्ड डेटही जाहीर करण्यात आली आहे. एमएसटीसीनं स्टॉक एक्स्चेंजला याबाबत माहिती दिली आहे. 

त्यानुसार, कंपनीच्या संचालक मंडळानं प्रत्येकी १० रुपये दर्शनी मूल्याच्या शेअर्सवर ६३ टक्के लाभांश देण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजेच पात्र गुंतवणूकदारांना प्रति शेअर ६.३० रुपये लाभांश मिळणार आहे. २२ फेब्रुवारी २०२२ ही तारीख कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत रेकॉर्ड डेट म्हणून घोषित करण्यात आली आहे.

कशी आहे कंपनीची कामगिरी?

एमएसटीसीचे शेअर शुक्रवारी २९८.२० रुपयांवर बंद झाला होता. गेल्या एका महिन्यात कंपनीच्या शेअरच्या किमतीत २ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. सुमारे सहा महिन्यांपूर्वी कंपनीच्या शेअर्समध्ये पैसे टाकणाऱ्या गुंतवणूकदारांचा आजचा नफा १९.९१ टक्क्यांवर गेलेला असेल. कंपनीचा ५२ आठवड्यांचा उच्चांक ३८६.४० रुपये आहे आणि ५२ आठवड्यांचा नीचांक २२४.३० रुपये आहे. आज हा शेअर जवळपास ३ टक्क्यांनी पडून २८९.४० रुपयांवर ट्रेड करत आहे.

WhatsApp channel

विभाग