मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Yahoo layoffs : नोकर कपातीचं सत्र सुरूच! 'याहू' १ हजार कर्मचाऱ्यांना काढणार

Yahoo layoffs : नोकर कपातीचं सत्र सुरूच! 'याहू' १ हजार कर्मचाऱ्यांना काढणार

Kulkarni Rutuja Sudeep HT Marathi
Feb 10, 2023 10:07 AM IST

Yahoo layoffs : याहूमध्ये कंपनीतील १२ टक्के म्हणजेच एक हजार कर्मचाऱ्यांना कंपनीतून बाहेरचा रस्ता दाखवण्यात येणार आहे. येत्या ६ महिन्यांत कंपनी उर्वरित ८ टक्के म्हणजेच ६०० लोकांना कामावरून काढून टाकेल.

layoffs HT
layoffs HT

Yahoo layoffs : याहू कंपनीमध्ये टाळेबंदी सुरू आहे. कंपनीतून २० टक्क्यांहून अधिक कर्मचाऱ्यांची कपात होऊ शकते. कंपनीने त्याच्या जाहिरात तंत्रज्ञान युनिटच्या मोठ्या पुनर्रचना करण्याची तयारी सुरु केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून, कर्मचारी कपातीचा निर्णय घेण्यात आला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

१६०० हून अधिक कर्मचाऱ्यांवर प्रभाव

कंपनी या युनिटमधून तिच्या एकूण कर्मचार्‍यांपैकी २०% पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांची कपात करु शकते. या कपातीमुळे याहूच्या ५० टक्क्यांपेक्षा जास्त अॅड टेक कर्मचाऱ्यांवर परिणाम होईल. हे प्रमाण अंदाजे १६०० इतके आहे,

यापूर्वी गुरुवारी याहूमधील १२ टक्के म्हणजेच एक हजार कर्मचाऱ्यांना कंपनीतून बाहेरचा रस्ता दाखवला जाईल आणि येत्या ६ महिन्यांत कंपनी उर्वरित ८ टक्के म्हणजेच ६०० लोकांना कामावरून काढून टाकेल. आर्थिक अडचणींमुळे हा कठोर निर्णय घेण्यात आल्याचे याहूचे सीईओ जीम लाझोने यांनी एका मुलाखतीत सांगितले.rutu

अमेरिकेत कर्मचारी कपातीचे सत्र

दरम्यान, यापूर्वी मनोरंजन क्षेत्रातील डिस्नेमध्येही कर्मचारी कपातीचा टप्पा सुरू झाला आहे. कंपनीने आपल्या सात हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्याचा निर्णय घेतला आहे. तर टेक कंपनी झूमने आपल्या १३०० कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची घोषणा केली होती. डेलनेही आपल्या सहा हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची घोषणा केली होती.

WhatsApp channel

संबंधित बातम्या

विभाग