मराठी बातम्या  /  बिझनेस  /  EPS pension : ईपीएस पेन्शन नियमात बदल, या कर्मचाऱ्यांना मिळणार अधिक पेंन्शन

EPS pension : ईपीएस पेन्शन नियमात बदल, या कर्मचाऱ्यांना मिळणार अधिक पेंन्शन

Kulkarni Rutuja Sudeep HT Marathi
Nov 17, 2022 05:36 PM IST

कर्मचारी पेन्शन योजना ईपीएफओअंतर्गत लाभार्थी सदस्य अधिक पेन्शन लाभ मिळविण्यासाठी आता योगदान रक्कम वाढवू शकतात.सर्वोच्च न्यायालयाने यासंदर्भात निर्णय नुकताच जाहीर केला आहे.

pension HT
pension HT

EPS pension : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने ईपीएफओच्या कर्मचारी पेन्शन योजनेतील सदस्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. यात ज्या कर्मचाऱ्यांनी आतापर्यंत २०२१४ पूर्वी वाढलेल्या पेंन्शन कव्हरेजचा पर्याय निवडलेला नाही, त्यांना पुढील चार महिन्यांत निवड करण्याची संधी देण्यात आली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना अधिक निवृत्ती वेतन मिळण्यासाठी, अधिक योगदान देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यासाठी कर्मचार्‍यांना ईपीएफओला एक घोषणापत्र द्यावे लागेल.

ट्रेंडिंग न्यूज

सर्वोच्च न्यायालयाने यासंदर्भात निर्णय देताना म्हटले आहे की, जे कर्मचारी भविष्य निधी संघटनेचे सदस्य आहेत, ते पेंन्शनसाठी आता अधिक योगदान देऊ शकतात.

दरम्यान त्यांना काही नियमांची पूर्तता करावी लागणार आहे. या निर्णयानुसार, निर्णयानुसार, पेन्शन योजनेचे सदस्य आता मूळ वेतनाच्या 8.33 टक्क्यांपेक्षा अधिक योगदान देऊ शकतील, तर पूर्वी ते पेन्शनपात्र वेतनाच्या 8.33 टक्के योगदान देत असत.

सर्वोच्च न्यायालयाने ४ नोव्हेंबर २०२२ रोजी दिलेल्या निकालात कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) ची ऑगस्ट २०१४ ची अधिसूचना वैध असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यासाठी पात्र कर्मचाऱ्यांना उच्च निवृत्ती वेतनासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख दिली आहे. यानुसार, आदेशानंतर ४ महिन्यांच्या आत कर्मचारी ज्या ठिकाणी ते काम करत होते,त्यांना घोषणापत्र देऊ शकतात जेणेकरून ते उच्च पेन्शनसाठी अधिक योगदान देऊ शकतील.

WhatsApp channel

संबंधित बातम्या

विभाग