मराठी बातम्या  /  बिझनेस  /  LIC on Adani : चिंता नको! अदानीमध्ये आमची गुंतवणूक एक टक्क्यापेक्षाही कमी, एलआयसीचा खुलासा

LIC on Adani : चिंता नको! अदानीमध्ये आमची गुंतवणूक एक टक्क्यापेक्षाही कमी, एलआयसीचा खुलासा

Kulkarni Rutuja Sudeep HT Marathi
Jan 31, 2023 11:35 AM IST

LIC clarification on Adani : अदानी समूहाच्या कंपन्यांमधील आपला भांडवली हिस्सा हा आपल्या व्यवस्थापनाखालील एकूण मालमत्तेच्या (एयूएम) १ टक्क्यापेक्षा कमी आहे, असे स्पष्टीकरण आयुर्विमा महामंडळाने (एलआयसी) सोमवारी दिले.

LIC Adani HT
LIC Adani HT

LIC clarification on Adani : अदानी समूहाच्या कंपन्यांमधील आपला भांडवली हिस्सा हा आपल्या व्यवस्थापनाखालील एकूण मालमत्तेच्या (एयूएम) १ टक्क्यापेक्षा कमी आहे, असे स्पष्टीकरण आयुर्विमा महामंडळाने (एलआयसी) सोमवारी दिले.

ट्रेंडिंग न्यूज

गेल्या अनेक वर्षांत अदानी समूहाच्या कंपन्यांच्या आम्ही खरेदी केलेल्या समभागांची एकूण किंमत ३०,१२७ कोटी रुपये आहे. दि. २७ जानेवारी रोजीच्या किमतींचा विचार केल्यास या समभागांचे बाजारमूल्य ५६,१४२ कोटी रुपये इतके आहे, असे एलआयसीने दिलेल्या एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. हिंडेनबर्ग रिसर्च या संस्थेने अदानी समुहाबद्दल प्रसिद्ध केलेल्या टिकात्मक अहवालामुळे अदानी समूहाच्या कंपन्यांना शेअर बाजारात फटका बसल्याने एलआयसीने स्पष्टीकरण दिले आहे.

"दि. ३१ डिसेंबर २०२२ रोजीनुसार अदानी समुहाच्या कंपन्यांमधील एलआयसीचे एकूण इक्विटी व डेट यांतील भागभांडवल ३५,९१७.३१ कोटी रुपये इतके आहे. अदानी समूहाच्या सर्व कंपन्यांमध्ये गेल्या अनेक वर्षांमध्ये आम्ही खरेदी केलेल्या इक्विटीचे एकूण खरेदी मूल्य ३०,१२७ कोटी रुपये आहे आणि २७ जानेवारी २०२३ रोजी बाजार बंद झाला त्यावेळी हे बाजारमूल्य रु. ५६,१४२ कोटी रुपये इतके होते. अदानी समुहाच्या अंतर्गत आजपर्यंतची गुंतवलेली एकूण रक्कम ३६,४७४.७८ कोटी रुपये इतकी आहे. मात्र ही गुंतवणूक ठराविक कालावधीत केली गेली आहे. एलआयसीकडे असलेल्या सर्व अदानी डेट सिक्युरिटीजचे क्रेडिट रेटिंग एए असे आहे आणि आयुर्विमा कंपन्यांना लागू असलेल्या इर्डाच्या गुंतवणूक नियमांचे पालन या रोख्यांच्या खरेदीत झालेले आहे, असे एलआयसीने पत्रकात नमूद केले आहे.

हे आहे प्रकरण

अमेरिकन गुंतवणूकदार हिंडेनबर्ग रिसर्चने दावा केला आहे की, अदानी समूह अनेक दशकांपासून शेअर्समध्ये हेराफेरी आणि खात्यामध्ये अफरातफरी करत आहे.हिडेनबर्गच्या अहवालानुसार, तीन वर्षात अदानी समुहाच्या शेअर्सचे मूल्य वाढवल्यामुळे गौतम अदानी यांच्या संपत्तीतही १०० अब्ज डाॅलर्सवरुन १२० अब्ज डाॅलर्सपर्यंत वाढ झाली आहे. या दरम्यान समुहाती अंदाजे ७ कंपन्यांच्या शेअर्सचे मूल्य ८१९ टक्क्यांनी वाढले आहे.

WhatsApp channel