मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Layoff : धडकी भरवणारं संकट! भारतासह जगभरात दररोज ३ हजार लोक गमावतायत नोकऱ्या

Layoff : धडकी भरवणारं संकट! भारतासह जगभरात दररोज ३ हजार लोक गमावतायत नोकऱ्या

Kulkarni Rutuja Sudeep HT Marathi
Jan 24, 2023 12:29 PM IST

Layoff : जगभरातील आर्थिक घडामोडींमध्ये होणारी घसरण आणि वाढती महागाई हे मंदीचे लक्षण असले तरी त्याचा सर्वात वाईट परिणाम अमेरिका, ब्रिटन आणि युरोपमध्ये दिसून येईल.

layoff HT
layoff HT

Layoff : आर्थिक मंदीचे संकेत आता मिळत आहेत. अलीकडच्या काही दिवसांत जगभरातील अनेक टेक कंपन्यांमधून कर्मचाऱ्यांना काढून टाकण्यात आल्याच्या बातम्या येत आहेत. गुगल अल्फाबेट आणि मायक्रोसॉफ्ट सारख्या मोठ्या कंपन्यांनी नुकतीच १० हजार कर्मचार्‍यांची कपात जाहीर केली आहे.

दररोज एक किंवा दुसरी कंपनी कर्मचार्‍यांना काढून टाकण्याचा निर्णय घेत आहे. एका खाजगी अहवालानुसार, 'भारतात तसेच जागतिक स्तरावर दररोज ३ हजार कर्मचारी नोकऱ्या गमावत आहेत. येत्या काळात ही परिस्थिती अधिक गंभीर होऊ शकते, कारण काही मोठ्या टेक कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात टाळेबंदी जाहीर केली आहे.

अशा परिस्थितीत प्रश्न पडतो की कंपन्या इतक्या वेगाने कर्मचाऱ्यांना का काढत आहेत आणि त्याचा भारतातील जनतेवर किती परिणाम होतो?

कंत्राटावर काम करणाऱ्यांना त्रास : पटना विद्यापीठातील अर्थशास्त्राचे प्राध्यापक विनय यांनी सांगितले की, हे वर्ष टेक कंपन्यांसाठी चांगले नाही. जागतिक मंदीच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर अनेक कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकतील.

करारावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना नोकरी गमावण्याचा सर्वाधिक धोका असतो. कारण ते त्यांच्या गरजेनुसार तात्पुरते ठेवले जातात. अशा परिस्थितीत जेव्हा कंपनी आर्थिक अडचणीत येते तेव्हा कंत्राटावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवला जातो.

कर्मचारी कपातीचे कारण

मेटा सीईओ मार्क झुकेरबर्ग यांनी त्यांच्या कंपनीतील ११ हजार कर्मचार्‍यांची कपात केली होती मोठ्या प्रमाणात नोकऱ्या दिल्यामुळे ही कपात करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले तज्ञांच्या म्हणण्यानुसार, बहुतेक कर्मचारी कोरोनाच्या काळात आजारी पडायचे. यामुळे कामावर परिणाम होऊ नये, म्हणून अनेक कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात लोकांना काम दिले. याशिवाय लॉकडाऊन दरम्यान अनेक कंपन्यांनी त्यांचे डिजिटल मार्केटिंगही वाढवले ​​आहे.

प्रोफेसर विनय यांच्या म्हणण्यानुसार, लॉकडाऊनमध्ये ऑनलाइन कामाच्या वाढत्या मागणीमुळे अनेक कंपन्यांनी आवश्यकतेपेक्षा जास्त लोकांना कामावर घेतले. आता बाजार घसरला आहे, त्यामुळे समतोल राखण्यासाठी कंपन्या लोकांना कामावरून काढत आहेत. वाढत्या आर्थिक मंदीच्या पार्श्‍वभूमीवर आपला खर्च कमी करण्यासाठी कंपन्या सातत्याने टाळेबंदी करत आहेत.

प्रोफेसर विनय यांनी सांगितले की, जागतिक मंदी हे देखील छाटणीचे सर्वात मोठे कारण मानले जात आहे. कोरोना महामारीने जगाची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त केली होती. आता रशिया-युक्रेन युद्धामुळे अर्थव्यवस्थेत मागणी आणि पुरवठ्यात प्रचंड चढ-उतार झाले आहेत. या युद्धाचा चीन, ब्रिटन, अमेरिका, भारत आणि जपानवरही जास्त परिणाम झाला आहे.

जानेवारीमध्ये ६५ हजार कर्मचाऱ्यांची टाळेबंदी

जानेवारी २०२३ पासून आतापर्यंत १६६ टेक कंपन्यांनी ६५ हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढले आहे. मायक्रोसॉफ्टच्या १० हजार कर्मचार्‍यांची छाटणी करण्यापूर्वी अँमेझाॅनने जागतिक स्तरावर १००० भारतीय कर्मचार्‍यांसह एकूण १८,००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे.

२०२२ मध्ये १५४३३६ कर्मचारी कपात

लेऑफ ट्रॅकिंग साइटवर दर्शविलेल्या डेटानुसार, २०२२ मध्ये, १००० हून अधिक कंपन्यांनी त्यांच्या कंपनीतून १५४३३६ कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले. नवीन वर्षाच्या पहिल्या महिन्यातच २०२२ वर्षातील कर्मचारी कपातीपेक्षाही अधिक कर्मचाऱ्यांना काढून टाकण्यात आले आहे. यामध्ये भारतातील स्टार्टअप्स सर्वाधिक आहेत. याचे उत्तम उदाहरण म्हणजे शेअरचॅट ही स्टार्टअप कंपनी ज्याने आपल्या कंपनीतील २० टक्के किंवा ५०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे.

कर्मचारी कपातीचा भारतावर परिणाम

सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीने भारतातील बेरोजगारीची आकडेवारी जाहीर केली आहे. त्यानुसार डिसेंबर २०२२ मध्ये आपल्या देशातील बेरोजगारीचा दर ८.३० टक्क्यांपर्यंत वाढला आहे. गेल्या १६ महिन्यांतील हा उच्चांक आहे. मोठ्या प्रमाणावरील कर्मचारी कपातीमुळे देशातील लोकांमधील बेरोजगारी आणखी वाढवत आहे. एका आकडेवारीनुसार, भारतात तसेच जागतिक स्तरावर दररोज ३००० कर्मचारी आपल्या नोकऱ्या गमावत आहेत.

WhatsApp channel

संबंधित बातम्या

विभाग