मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Google lay off : गुगलच्या १२ हजार कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची टांगती तलवार, पिचईंचे भावनिक पत्र

Google lay off : गुगलच्या १२ हजार कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची टांगती तलवार, पिचईंचे भावनिक पत्र

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Jan 20, 2023 09:55 PM IST

Googlelay off : मायक्रोसॉफ्टनंतर आता गुगनेही कर्मचारी कपातीची घोषणा केली आहे. गुगल १२ हजार कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार असून कंपनीचे सीईओ सुंदर पिचई यांनी संबंधित कर्मचाऱ्यांना भावनिक पत्र लिहिले आहे.

गुगलच्या १२ हजार कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची टांगती तलवार
गुगलच्या १२ हजार कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची टांगती तलवार

Google ची पॅरेंट कंपनी अल्फाबेट इंक (GOOGL.O) मध्ये नोकरकपात केली जाणार आहे. कंपनी जवळपास १२,००० कर्मचाऱ्यांवर नोकरी गमावण्याची टांगती तलवार आहे. अल्फाबेट इंकमध्ये होणारी नोकरकपात टेक सेक्टरमध्ये मोठा झटका मानला जात आहे. आर्थिक मंदीच्या शक्यतेने जगभरातील कंपन्यांमध्ये २०२२ पासून नोकरकपातीचे सुरू झालेले सत्र यावर्षीय कायम आहे.

सुंदर पिचई यांनी घेतली जबाबदारी -

मेटा (Facebook)-ट्विटर (Twitter) आणि अमेझॉन (Amazon) सारख्या कंपन्यात वर्क फोर्समध्ये मोठी कपात करण्यात आली आहे. या लिस्टमध्ये आता गूगल अल्फाबेटचे नावही जोडले गेले आहे.कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या ई-मेलमध्ये कंपनीचे सीईओ सुंदर पिचई यांनी म्हटले की, नोकरकपातीच्या निर्णयाची मी पूर्ण जबाबदारी घेतो. त्यांनी म्हटले की, आमचे लक्ष्य कॉस्ट बेसमध्ये दल करणे, टॅलेंट आणि भांडवलाला आमचे प्राधान्य आहे.

गूगल अल्फाबेटमधील नोकरकपातग्लोबल लेव्हलवर असेल.अल्फाबेटने संबंधित कर्मचाऱ्यांनाईमेल केले आहेत. तरअन्य देशांतस्थानिक रोजगार कायदा व नियमांमुळे प्रक्रियेला अधिक वेळ लागेल.

सुंदर पिचई म्हणाले की,

पिचई यांनी म्हटले की,'Googlers, माझ्याकडे तुमच्याशी शेअर करण्यासाठी एका निराशाजनक बातमी आहे. आम्ही आपल्या वर्कफोर्समधून १२,००० नोकऱ्या कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत आम्ही आधी अमेरिकेत प्रभावित कर्मचाऱ्यांना एक वेगळा मेल केला आहे. याचा अर्थ काहीप्रतिभाशाली लोकांना अलविदा म्हणावे लागेल ज्यांच्या नियुक्तीसाठी आम्ही खूप मेहनत केली होती व ज्यांच्यासोबत काम करणे पसंत केले होते. यासाठी मी खेद व्यक्त करतो. मी त्या निर्णयांची जबाबदारी घेतो जे आम्हाला येथपर्यंत घेऊन आले.

पिचई म्हणाले की, ज्या कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त केली आहे त्यांना २०२२ चाबोनसआणि शिल्लक सुट्ट्यांचे पैसे मिळतील. त्याचबरोबर ६० दिवसांचे अतिरिक्तवेतन दिले जाईल. कंपनीनेम्हटले की,Google मध्येप्रत्येक अतिरिक्त वर्षासाठी १६ आठवड्यांचे वेतनासोबतदोन आठवड्यापासून सुरू होणाराएक सेवरेंसपॅकेजही सादर केले जाईल. त्याचबरोबरकर्मचाऱ्यांना६ महिन्यांचीहेल्थ सुविधा,नोकरीदेण्याची सेवा आणिअन्य सहायतासादर केली जाईल.

 

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या

विभाग