मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Sharechat layoff : शेअरचॅटमध्ये होणार नोकरकपात; ४०० कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची टांगती तलवार

Sharechat layoff : शेअरचॅटमध्ये होणार नोकरकपात; ४०० कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची टांगती तलवार

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Jan 16, 2023 09:02 PM IST

Sharechat layoff : शेअरचॅटमध्ये २० टक्के कर्मचारी कपात करण्यात येणार असल्याचे कंपनीने जाहीर केले आहे. त्यामुळे जवळपास ४०० कर्मचाऱ्यांना नोकरी गमवावी लागणार आहे.

शेअरचॅट
शेअरचॅट

ट्विटर, फेसबुक, झोमॅटोसारख्या बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये कर्मचारी कपात केल्यानंतर आता याचे लोण अनेक कंपन्यांमध्ये पसरत आहेत. सोशल मीडिया कंपनी शेअरचॅटमध्ये लवकरच मोठी नोकरकपात करण्यात येणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. शेअरचॅट,मोज यांची मुळ कंपनी असणाऱ्या मोहल्ला कंपनीमध्ये २० टक्के कर्मचारी कपात होणार आहे,ज्यामुळे जवळपास ४०० कर्मचाऱ्यांना नोकरी गमवावी लागणार आहे, याची माहिती कंपनीने कर्मचाऱ्यांना ई-मेल करून दिली असल्याचे सांगितले जात आहे.

नोकरकपातीबाबत कंपनीने म्हटले आहे की, कंपनीच्या स्थापनेपासून कधीही कर्मचाऱ्यांना कामावरून काढले नाही. मात्र सध्याच्या आर्थिक परिस्थितीमुळे इतिहासातील काही कटू निर्णय व्यवस्थापनाला घ्यावे लागत आहेत. ‘एक्सटर्नल मॅक्रो फॅक्टर’ मुळे हा निर्णय घ्यावा लागत आहे. याअंतर्गत कंपनीशी जोडल्या गेलेल्या २० टक्के कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यात येत आहे.ओला,ओयो,डनझो,ब्लिंक इट,बायजुज यांसारख्या कंपन्यांनी गेल्या काही महिन्यांमध्ये नोकरकपात जाहीर केली आहे.

जागतिक मंदीच्या सावटाखाली वभारतीय स्टार्टअप्सच्या अत्यंत कठीण काळात ही नोकरकपात करण्यात येत आहे. जे स्टार्टअप्स सुरूवातीला सुरक्षित आणि जास्त पगार दिले जाणारे मानले जात होते,ते आता नोकरकपात करत आहेत.

 

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या