मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Microsoft layoff : मायक्रोसॉफ्टची मोठी घोषणा, १० हजार कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार

Microsoft layoff : मायक्रोसॉफ्टची मोठी घोषणा, १० हजार कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Jan 18, 2023 09:33 PM IST

Microsoft layoff : आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी मायक्रोसॉफ्टने तब्बल १० हजार कर्मचाऱ्यांना नारळ देण्याची तयारी केली आहे. अशी घोषणा कंपनीचे सीईओ सत्या नाडेला यांनी केली आहे.

Microsoft layoff
Microsoft layoff

Microsoft Layoff News : आर्थिक मंदीच्या सावटाखाली दिग्गज कंपनी मायक्रोसॉफ्ट (Microsoft) ने तब्बल १० हजार कर्मचाऱ्यांना नारळ देण्याची तयारी सुरू केली आहे. कंपनीचे घटता महसूल काळजीचे कारण सांगितले जात आहे. मायक्रोसॉफ्ट (Microsoft) कंपनीच्या आधी अमेझॉन, सेल्सफोर्स सारख्या कंपन्यांनीही कर्मचारी कपात केली आहे. याच आठवड्याच्या सुरुवातीला भारताची स्टार्ट अप कंपनी शेयरचॅटनेही ६०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले होते. 

कंपनीकडून सांगितले जात आहे की, आर्थिक वर्ष २०२३ च्या अखेरपर्यंत जवळपास पाच टक्के वर्क फोर्स कमी केले जाईल. यामागे कंपनीने खराब आर्थिक स्थितीची हवाला दिला आहे. 

मायक्रोसॉफ्टने बुधवारी सांगितले की, त्यांनी कर्मचाऱ्यांना याची सूचना दिली आहे. यापैकी काहींना तात्काळ प्रभावाने हटवले आहे. कंपनीने म्हटले की, ते आपल्या हार्डवेयर विभागातही बदल करत आहेत. त्याचबरोबर भाड्याने घेतलेली कार्यालयांची संख्याही कमी केली जाणार आहे. कंपनीच्या या निर्णयाने जवळपास १.२ अब्ज डॉलरची बचत होईल. 

Microsoft चे CEO सत्या नडेला काय म्हणाले? 

दावोस मध्ये मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला यांनी म्हटले की, आम्ही आमच्या भविष्यातील रणनितीवर व स्पर्धेत राहण्यासाठी गुंतवणूक सुरू ठेवणार आहोत. म्हणजे आम्ही आमचा पैसा व टॅलेंट लाँग टर्म लक्षात घेऊन ग्रोथवर फोकस करत वेगवेगळ्या क्षेत्रात वापरले जाईल. त्यांनी म्हटले की, आम्हाला या प्रवासात साथ देणाऱ्यांचे आभार.

कंपनीने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, ज्या कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले जाईल त्यांना आमची मदत कायम राहील. मायक्रोसॉफ्टने म्हटले आहे की, अशा कर्मचाऱ्यांना ६ महिन्यांसाठी हेल्थकेयर कव्हरेज, टरमिनेशनपूर्वी ६० दिवसांची नोटीस आदि सुविधा कर्मचाऱ्यांना दिली जाईल. 

WhatsApp channel