मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Lucky Zodiac Signs : कर्जाची परतफेड, अचानक धनलाभ! शशी योगामुळे या ५ राशी आज ठरणार लकी

Lucky Zodiac Signs : कर्जाची परतफेड, अचानक धनलाभ! शशी योगामुळे या ५ राशी आज ठरणार लकी

Priyanka Chetan Mali HT Marathi
May 09, 2024 11:07 AM IST

Lucky Rashi Bhavishya 9 May 2024 : आज ९ मे २०२४ गुरुवार रोजी, चंद्र आणि गुरुच्या संयोगाने गजकेसरी योग तयार होत आहे. इतकेच नव्हे तर आज शोभन योग, शशी योगसुद्धा जुळून येत आहेत. अशात कोणत्या राशीचे लोक लकी ठरतील जाणून घ्या.

लकी राशीभविष्य, नशीबवान राशी ९ मे २०२४
लकी राशीभविष्य, नशीबवान राशी ९ मे २०२४

आज गुरुवार ९ मे २०२४ रोजी, चंद्र वृषभ राशीत वृषभ राशीत प्रवेश करणार आहे, जिथे बृहस्पति आधीपासूनच आहे, त्यामुळे गजकेसरी योग तयार होत आहे. तसेच आज वैशाख महिन्यातील कृष्ण पक्षाची प्रतिपदा, द्वितीया तिथी आहे. या दिवशी गजकेसरी योगासह शोभन योग आणि कृतिका नक्षत्राचा शुभ संयोग असल्याने दिवसाचे महत्त्व अधिकच वाढले आहे. ज्योतिष शास्त्रानुसार या ५ राशींना आज शुभ योग तयार होत असल्याने लाभ होईल.

मेष

आजच्या नशीबवान राशींच्या यादीतील पहिली राशी आहे मेष राशी. या राशीसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. हातात घेतलेल्या कामात यश मिळेल. मनातील दीर्घ इच्छा पूर्णत्वास जातील. तुमच्या सुस्वभावामुळे घरातील लोकांचे नातेवाईकांचे प्रेम प्राप्त होईल. जोडीदारासोबत मनमोकळेपणाने संवाद होईल. त्यामुळे नातेसंबंध सुधारण्यास मदत होईल. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल अन्यथा जुनाट आजार उद्भवू शकतात. कामाच्या ठिकाणी चांगली प्रगती होईल. वरिष्ठांकडून कामाचे कौतुक होईल. त्यामुळे आत्मविश्वास वाढेल. धार्मिक कार्यांत रुची वाढेल. जोडीदारासोबत धार्मिक स्थळी भेट देण्याचा योग येईल.

मिथुन

आजच्या नशीबवान राशींमध्ये मिथुन राशीचासुद्धा समावेश होत आहे. मिथुन राशीसाठी आजचा दिवस शुभ असणार आहे. आज अनेक आश्चर्यकारक घटना घडतील. महत्वाच्या कामात काळजीपूर्वक निर्णय घेण्याची गरज भासेल. आज स्वतःवर आत्मविश्वास ठेवणे गरजेचे आहे. हातात घेतलेल्या महत्वाच्या कामात भावंडाचे किंवा मित्रांचे सहकार्य लाभेल. मित्रांच्या सहवासाने मन प्रसन्न राहील. मित्रांसोबत बाहेर फेरफटका मारण्याचा विचार मनात येईल. त्यानुसार कृती कराल. आज आर्थिक स्थिती स्थिर राहील. जुन्या कर्जाची परतफेड करण्यात यशस्वी व्हाल. घरातील वातावरण आनंदी राहील. लहान मुलांच्या सानिध्यात वेळ चांगला जाईल.

सिंह

सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. लग्न करण्यासाठी इच्छुक असणाऱ्या व्यक्तींचे विवाह जुळण्याची शक्यता आहे. मनमोकळ्या संवादातून नातेवाईकांसोबत असलेले मतभेद संपुष्ठात येऊन संबंध सुधारतील. घरामध्ये मोठ्या खरेदी होतील. त्यामुळे घरातील वातावरण आनंदी राहील. विद्यार्थ्यांचे अभ्यासात मन लागेल. त्यामुळे भविष्यात चांगली शैक्षणिक प्रगती दिसून येईल. व्यावसायिकांना नवीन लाभ मिळवण्यासाठी जास्तीचे कष्ट करावे लागतील. आईसोबत अचानक एखाद्या नातेवाईकाकडे भेट देण्याचा योग येऊ शकतो. संध्याकाळचा वेळ मित्रांच्या सहवासात घालवाल. संवादातून काही महत्वाच्या गोष्टी कानावर पडण्याची शक्यता आहे.

तूळ

तूळ राशीच्या लोकांसाठीसुद्धा आजचा दिवस शुभ असणार आहे. कामामध्ये मोठे यश मिळेल. दिवसभर मन आनंदी राहील. कामाच्या ठिकाणी प्रतिस्पर्धीनां मागे टाकण्यात यश मिळेल. कुटुंबात सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करत असलेल्या सदस्याला नोकरी प्राप्त होण्याची शक्यता आहे. अनपेक्षितपणे परदेशवारी करण्याचा योग जुळून येईल. आज भाग्याची साथ मिळणार असल्याने धनप्राप्ती होईल. अचानक पैसे मिळाल्याने मन उत्साही आणि आनंदी राहील. वैवाहिक आयुष्यात सुख आणि समृद्धी लाभेल. सायंकाळी धार्मिक ठिकाणाला भेट देऊन अध्यात्मिक गोष्टींमध्ये वेळ घालवाल.

धनु

धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. तुमचे आरोग्य उत्तम राहणार आहे. त्यामुळे मनात उत्साह वाढून दिवस आनंदी जाईल. अनेक दिवसांपासून अडकलेले पैसे आज परत मिळतील. विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती होण्याचा वेग वाढेल. दिवसभरात हातात घेतलेल्या कामात घवघवीत यश मिळेल. मनासारखे यश मिलाळाल्याने आत्मविश्वास वाढीस लागेल. धार्मिक-अध्यात्मिक कार्यांमध्ये रुची वाढेल. आज जवळपास ७७ टक्के भाग्य तुमच्या बाजूने असणार आहे.

WhatsApp channel