हिंदू धर्मात अक्षय तृतीयेला प्रचंड महत्व आहे. या दिवशी सोने खरेदी करण्याची मान्यता आहे. येत्या १० मे रोजी अक्षय तृतीया साजरी केली जाणार आहे. या शुभदिनी आणखी काही शुभयोग जुळून येणार आहेत. अक्षय तृतीयेदिवशी बुध ग्रह मेष राशीत संक्रमण करणार आहे. तत्पूर्वी या राशीत सूर्यानेसुद्धा संक्रमण केले असणार आहे. या दोघांच्या संयोगाने बुधादित्य राजयोग निर्माण होणार आहे. त्यामुळेच या अक्षय तृतीयेला राशीचक्रातील ५ राशींचा अफाट फायदा होणार आहे.
अक्षय तृतीये दिवशी येणाऱ्या बुधादित्य राजयोगाचा फायदा मेष राशीला होणार आहे. बुध ग्रहाच्या संक्रमणाने मेष राशीच्या लोकांना कामात यश येणार आहे. नोकरीत बढती मिळण्याची शक्यता आहे. सोबतच नोकरीच्या नव्या ऑफर्स मिळणार आहेत. अचानक अडकलेले पैसे परत मिळतील. त्यामुळे घरातील वातावरण उत्साही राहील.
अक्षय तृतीयानिमित्त जुळून येणाऱ्या शुभ योगाचा फायदा मिथुन राशीलासुद्धा होणार आहे. आयुष्यात सुख समृद्धी येईल. घरात चांगल्या गोष्टींची भरभराटी होईल. लक्ष्मीच्या कृपेने पैशांची कमतरता अजिबात भासणार नाही. करिअरमध्ये चांगली प्रगती होईल. जोडीदारासोबत संबंध सुधारतील. भविष्याच्या विचाराने पैशांची बचत कराल .
बुध ग्रहाच्या संक्रमणाने सिंह राशीमध्ये धनयोग दिसून येत आहे. सिंह राशीतील लोकांना अचानक मिळकतीचे विविध मार्ग खुले होतील. त्यामुळे आत्मविश्वास वाढेल. जोडीदारासोबत मनमोकळेपणाने संवाद साधता येईल. यातून नाते अधिक मजबूत होईल. जोडीदारासोबत बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन बनू शकतो.
इतर तीन राशींप्रणमाणेच तूळ राशीतसुद्धा बुध ग्रहाचे संक्रमण शुभ असणार आहे. या शुभयोगाने धनलाभ होणार आहे. तसेच नोकरदारवर्गाला नोकरीत पदोन्नती होईल. अनेक दिवसांपासून असलेल्या जुन्या आजारातून मुक्ती मिळेल. फिटनेसकडे विशेष लक्ष द्याल. जुन्या मित्रांच्या गाठीभेटी जुळून येतील. मित्रांच्या सहवासात दिवस आनंदी जाईल. मन प्रसन्न राहिल्याने आयुष्यात सकारत्मक बदल जाणवतील.
बुध ग्रहाच्या संक्रमणाने मकर राशीसुद्धा फायद्यात असणार आहे. मकर राशीतील लोकांच्या भौतिक सुखात वाढ होईल. अचानक धनलाभ झाल्याने आलिशान आयुष्य जगण्यावर भर द्याल. जोडीदारासोबत जास्त वेळ घालवाल. तुमचा मूड रोमँटिक राहील. एकंदरीत हा बुधादित्य राजयोग तुमच्यासाठी खास असणार आहे.
संबंधित बातम्या