आज गुरुवार २५ एप्रिल रोजी, तूळ राशीनंतर चंद्र वृश्चिक राशीत जाणार आहे. आजच्या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग, व्यतिपात योग आणि विशाखा नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने आजच्या दिवसाचे महत्त्वही वाढले आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार आज तयार होत असलेला शुभ योग मिथुन, मकर राशीसह इतर ५ राशींना लाभदायक ठरणार आहे.
आज फायदे मिळवाल. आनंददायी वातावरण राहील. व्यापारात वेळेवर घेतलेले निर्णय फायदेशीर ठरतील. भागीदारीत अपेक्षित लाभाचे योग आहेत. स्थावर मालमला संपत्तीचे प्रश्न मार्गी लागेल. स्वसंपादिन धनाचा उपभोग घ्याल. क्रिडाक्षेत्रातील व्यक्तिंना योग्य संधी चालून येतील. घर खरेदीची शक्यता आहे. कुटुंबातील वातावरण उत्साही राहणार आहे. जुने मित्र सहकारी भेटतील. व्यवसाया निमित्त प्रवास होईल.
आज मनावरचा ताण बर्यापैकी कमी झालेला असेल. सहकुटुंब प्रवासाचा बेत आखाल. कौटुंबिक पातळीवर जोडिदाराचं चांगले सहकार्य मिळणार आहे. त्यांच्या मदतीने महत्त्वाचे निर्णय घेणे निश्चित शक्य होईल. सामाजिक कार्यात भाग घ्याल. नवीन योजनेस प्रारंभ करण्यास उत्तम दिवस आहे. खर्चावर मात्र नियंत्रण ठेवा. चैनीच्या वस्तू घेण्याकडे ओढ राहील. विद्यार्थ्यांना साहित्य वाचनाची आवड निर्माण होईल. प्रेमप्रकरणात अनुकूलता येईल.
आज तुमच्या बोलण्याची छाप इतरांवर पडेल. घरातआणि घराबाहेर उत्साहाचे आनंदी वातावरण राहील. एखादी मोठी गुंतवणक करण्यासाठी दिवस चांगला आहे. कार्यक्षेत्रात नाविन्यपूर्ण प्रयोग कराल. नवीन प्रकल्प हाती येतील. आपल्याला केलेल्या कामाचे सकारात्मक परिणाम दिसतील. व्यापारात आर्थिकवृद्धी होईल. भागीदाराकडून सहकार्य लाभेल. महत्वाच्या कामानिमित्त प्रवास घडेल आणि त्यातून आर्थिक लाभ होईल. कौटुंबिक सौख्य उत्तम राहील.
आज एखाद्या गोष्टीचा लाभ मिळेल असं वाटत असेल तर योग्य मार्गाचा अवलंब केल्यास फायदा होईल. आर्थिक प्रगती होईल. मनातील योजना पार पाडता येणार आहेत. जोडीदाराची उत्तम साथ लाभणार आहे. नोकरी व्यापारात कामाचा विस्तार वाढेल. संततीची बौद्धिक प्रगती पाहून समाधान लाभेल.
आज शैक्षणिक क्षेत्रात काम करणार्यांना विशेष संधी मिळतील. कौटुंबिक पातळीवर पत्नीकडून व संततीकडून उत्तम सुख मिळेल. लेखन कार्य व ग्रंथप्रकाशानात लाभ होईल. नातेवाईकांकडून आर्थिक मदत मिळेल. मित्रमैत्रिणींकडून लाभ होतील. नवीन व्यापार प्रारंभ करण्यासाठी शुभ दिवस आहे. व्यापारात उत्तम धनप्राप्ती होईल. प्रवासातून आर्थिक लाभ घडतील.
संबंधित बातम्या